स्मृती मानधना हिच्यासोबतचे लग्न पुढे ढकलताच पलाश मुच्छल याने घेतला अत्यंत मोठा निर्णय, थेट जगजाहीर करत…
Smriti Mandhana and Palash Muchhal wedding : स्मृती मानधना आणि तिचा प्रियकर पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या अगोदर मोठं वादळ आलं. संगीत, हळद झाल्यानंतर लग्न अचानक पुढे ढकलण्यात आले. मात्र, त्यानंतर पलाशचे काही स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाली. आता थेट पलाशने मोठा निर्णय घेतला.

भारतीय क्रिकेटर स्मृती मानधना आणि तिचा प्रियकर पलाश मुच्छल यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी सांगलीत होणार होते. संगीत, हळद आणि मेहंदीचा जोरदार कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात भारतीय महिला क्रिकेट संघ धमाल करताना दिसला. स्मृती मानधना आणि तिचा प्रियकर पलाश यांच्याही डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. लग्नात एक ट्विस्ट आला आणि लग्न काही मिनिटे आधी थांबले. स्मृतीच्या वडिलांची तब्येत खराब झाली आणि लग्न थांबवले गेले असे सांगण्यात आले. धक्कादायक म्हणजे स्मृती मानधना हिच्या वडिलांनंतर पाठोपाठ प्रियकर आणि होणारा पती पलाश मुच्छल यालाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर काही धक्कादायक अशी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. ज्यामध्ये पलाश स्मृती मानधनाला धोका देत असल्याचे दिसले.
स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराची लक्षण जाणवल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर पलाशचे चॅटिंगचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाली आणि एकच खळबळ उडाली. स्मृती मानधना हिच्या वडील रूग्णालयातून घरी आले आहेत आणि त्यांची तब्येत स्थिर असल्याचीही माहिती आहे. मात्र, स्मृती मानधना, पलाश किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून लग्नाचे कोणतेही अपडेट देण्यात आले नाहीये.
स्मृती मानधना आणि पलाश यांनी एकत्र येत सुरू असलेल्या चर्चांवर साधे भाष्यही केले नाही. यामुळे संशय अधिकच वाढत आहे. दुसरीकडे विदेशात होणाऱ्या क्रिकेट सामन्यासाठी स्मृती मानधना जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्येच आता पलाश याने सोशल मीडियावर मोठा निर्णय घेतला आहे. इंस्टाग्रामवर पलाश मुच्छल याने बायोमध्ये सुरक्षाकवचचा इमोजी ठेवला आहे. कोणाची नजर लागू नये म्हणून.

दुसरीकडे श्रीनिवास मानधना हिच्या इंस्टाच्या बायोमध्ये अगोदरच हा इमोजी ठेवण्यात आला. कोणाचीही नजर लागू नये, म्हणून दोघांनीही सोशल मीडियावर प्रोफाईलवर सुरक्षाकवचचा इमोजी ठेवला. पलाश मुच्छल लग्न पुढे ढकलल्यापासून वादात सापडला आहे. तो सध्या सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. मात्र, त्याने लग्नाबद्दल सुरू असलेल्या चर्चेवर अजिबातच भाष्य केले नाही. स्मृती मानधना हिने संगीत आणि हळदीचे व्हिडीओही डिलीट केली.
