अॅडलेड कसोटी : पुजाराच्या शतकाने भारताची लाज राखली!

अॅडलेड (ऑस्ट्रेलिया) : अॅडलेडमध्ये सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाची दाणादाण उडाली. मात्र, चेतेश्वर पुजाराने शतकी खेळीसह डाव सावरला आणि भारताची लाजही राखली. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण सुरुवातीपासूनच एक-एक करत खेळाडू तंबूत परतू लागले. अखेर चेतेश्वर पुजाराने सर्वोत्तम कामगिरी करत, भारताची धावसंख्या सुस्थितीत आणली. पहिल्या दिवशी […]

अॅडलेड कसोटी : पुजाराच्या शतकाने भारताची लाज राखली!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

अॅडलेड (ऑस्ट्रेलिया) : अॅडलेडमध्ये सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाची दाणादाण उडाली. मात्र, चेतेश्वर पुजाराने शतकी खेळीसह डाव सावरला आणि भारताची लाजही राखली. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण सुरुवातीपासूनच एक-एक करत खेळाडू तंबूत परतू लागले. अखेर चेतेश्वर पुजाराने सर्वोत्तम कामगिरी करत, भारताची धावसंख्या सुस्थितीत आणली. पहिल्या दिवशी 9 खेळाडूंच्या बदल्यात भारताने 250 धावा बनवल्या.

नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, 41 धावांमध्ये भारताचे 4 खेळाडू माघारी परतले. मात्र, चेतेश्वर पुजाराने एकहाती खिंड लढवत, सर्वोत्तम खेळी केली आणि शतक ठोकलं.

भारतीय संघाची धावसंख्या 100 पूर्ण होण्याआधीच 5 खेळाडू माघारी परतले होते. मात्र, पुजाराने पार्टनशिपमधील सर्व खेळाडूंसोबत थोडी-थोडी भागिदारी करत, शतक ठोकलं आणि टीम इंडियाला 250 धावसंख्येपर्यंत नेण्यात यश मिळवलं.

पुजाराने रोहित शर्मासोबत 25 धावांची, ऋषभ पंतसोबत 41 धावांची, आर. आश्विनसोबत 62 धावांची, ईशांत शर्मासोबत 21 धावांची, तर मोहम्मद शामीसोबत 40 धावांची भागिदारी केली. त्यानंतर आजचा दिवस संपताना, पुजारा रन-आऊट झाला.

पुजाराने 246 चेंडूत 123 धावांची खेळी केली. त्याच्या या धडाकेबाज खेलीत 7 चौकार आणि 2 षटकाराचा समावेश आहे. चेतेश्वर पुजारा वगळता रोहित शर्माने 37 धावांची, ऋषभ पंतने 25 धावांची आणि आर. अश्विनने 25 धावांची खेळी केली.

पुजाराच्या खेळीच्या महत्त्वाच्या गोष्टी :

  • कसोटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजाराने 16 वं शतक ठोकलं
  • पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्या.
  • ऑस्ट्रेलिया पुजाराने सर्वाधिक 73 धावा ठोकल्या होत्या. 2014 साली तो सामना देखील अॅडलेडमध्येच झाला होता. आता अॅडलेडवरच पुजाराने 123 धावा करत, स्वत:च्या नावावर विक्रम नोंदवला आहे.