ind vs aus 3rd Test : राहुलचा पत्ता कट, सूर्यकुमार यादव याची एन्ट्री? ‘तो’ फोटो होतोय तुफान व्हायरल!

| Updated on: Feb 25, 2023 | 6:08 PM

तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय संघामध्ये काही बदल दिसण्याची शक्यता आहे. फॉर्ममध्ये नसलेल्या के. एल. राहुलचा पत्ता कट होणार? पाहा नेमका कोणता फोटो झालाय व्हायरल

ind vs aus 3rd Test : राहुलचा पत्ता कट, सूर्यकुमार यादव याची एन्ट्री? तो फोटो होतोय तुफान व्हायरल!
Follow us on

Ind vs Aus 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील चार सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-0 ने टीम इंडिायने आघाडी घेतली आहे. कांगारूंच्या संघाला आधीच दुखापतीने विळखा घातला आहे. कर्णधार पॅट कमिन्ससह काही स्टार खेळाडू तिसऱ्या कसोटीमध्ये असणार नाहीत. ऑस्ट्रेलिया ही मालिका 4-0 ने गमावणार असल्याची भाकीत आताच काहींनी वर्तवली आहेत. अशातच तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय संघामध्ये काही बदल दिसण्याची शक्यता आहे. फॉर्ममध्ये नसलेल्या के. एल. राहुलचा पत्ता कट होणार असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव अंतिम अकरामध्ये स्थान मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे.

सूर्यकुमार यादव याने तिसऱ्या कसोटीआधी आपल्या इन्स्टावर एक स्टोरी टाकली आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा आणि सूर्यकुमार दिसत आहे. हा फोटो पाहून सोशल मीडियावर चर्चा आहे की आता सूर्या तिसऱ्या कसोटीमध्ये खेळताना दिसणार असल्याचं बोललं जात आहे. नागपूर कसोटीमध्ये सूर्याने कसोटीमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र सूर्याला मोठी खेळी करता आली नव्हती. त्यानंतर युवा खेळाडू श्रेयस अय्यर परतला आणि सूर्याला दुसऱ्या कसोटीमधून बाहेर बसावं लागलं होतं.

तिसऱ्या कसोटीमध्ये भारताकडून के. एल. राहुलला डच्चू दिला जावू शकतो. संघ व्यवस्थापन वेगळा प्रयोग म्हणून सूर्यालाही सलामीला पाठवू शकतं. तसं पाहायला गेलं फिट होऊन परतलेल्या अय्यरलाही मोठी खेळी करता आली नव्हती. त्यामुळे कदाचित त्याच्याही जागेवर सूर्याला मधल्या फळीमध्ये फलंदाजी करण्यासाठी संधी मिळू शकते.

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेविड वॉर्नर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.