Rishabh Pant: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे संघातून डावललं, पण बीसीसीआयनं ऋषभ पंतला मोठी जबाबदारी

Rishabh Pant News: भारत आणि वेस्ट इंडिजसाठी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे, या संघात पंतला स्थान देण्यात आले नसले तरीही बीसीसीआयनं मोठी जबाबदारी दिली आहे.

| Updated on: Sep 17, 2026 | 7:54 AM
1 / 5
 वेस्ट इंडिजचा संघ वनडे आणि टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. वेस्ट इंडिज या दौऱ्यात 3 वनडे सामने आणि 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

वेस्ट इंडिजचा संघ वनडे आणि टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. वेस्ट इंडिज या दौऱ्यात 3 वनडे सामने आणि 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

2 / 5

वेस्ट इंडिज विरोधातील वनडे मालिकेत भारताचा आक्रमक फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत याला संधी मिळालेली नाही, पण बीसीसीआयने यावेळी मात्र त्याला मोठी संधी दिली आहे.

3 / 5

बीसीसीआयने वेस्ट इंडिज विरोधातील वनडे आणि टी 20 मालिकेसाठी भारताचे संघ जाहीर केले. वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचे कर्णधारपद शुभमन गिलकडे असणार आहे. टी-20 मालिकेसाठी भारताचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे असेल.

4 / 5

बीसीसीआयनं इराणी कप स्पर्धेसाठी शेष भारत संघाचे कर्णधारपद ऋषभ पंतकडे सोपवले आहे. इराणी कप स्पर्धेत शेष भारत आणि रणजी ट्रॉफी विजेते जम्मू काश्मीर यांच्यात सामना रंगणार आहे.

5 / 5

शेष भारत आणि जम्मू काश्मीर यांच्यातील सामना 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबरल दरम्यान श्रीनगरमध्ये पार पडणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us