AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जय हिंदच्या ऐवजी अस्सलाम वालैकुम म्हणाली, क्रिकेटरने घेतली IPS अधिकाऱ्याची बाजू, थेट…

IPS Bushra Bano: गेल्या काही दिवसांपासून IPS अधिकारी बुशरा बानो या चांगल्याच चर्चेत आहेत. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमुळे नव्या वादाला तोंड फुटले. आता या प्रकरणावर क्रिकेटपटूने प्रतिक्रिया देत बुशरा यांची बाजू घेतली आहे.

जय हिंदच्या ऐवजी अस्सलाम वालैकुम म्हणाली, क्रिकेटरने घेतली IPS अधिकाऱ्याची बाजू, थेट...
Bushra BanoImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 17, 2026 | 9:33 AM
Share

पश्चिम बंगालमध्ये खडगपूरच्या एएसपी आणि २०२१ बॅचच्या आयपीएस अधिकारी बुशरा बानो सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये वापरलेल्या शब्दांमुळे त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर हा वाद आणखी चिघळला. आता यावर ता माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत बुशरा बानो यांच्या बदलीबाबत प्रश्न विचारले आहेत. त्यांनी म्हटले की, ‘अस्सलाम वालेकुम’ आणि ‘इंशाल्लाह’ म्हटल्यामुळे एका IPS अधिकाऱ्याची बदली करणे हे अत्यंत चिंताजनक आहे. माजी क्रिकेटर आणि माजी खासदार मोहम्मद अजहरुद्दीन म्हणाले की, जेव्हा अभिवादन हे एखाद्या लोकसेवकाला लक्ष्य करण्याचा आधार बनते, तेव्हा आपण अल्पसंख्याकांना कोणत्या प्रकारचा संदेश देत आहोत, हा प्रश्न विचारला पाहिजे. पुढे त्यांनी म्हटले की, भारताची ताकद त्याच्या विविधतेत आहे, ओळखीवर नियंत्रण ठेवण्यात नाही.

काही दिवसांपूर्वी झाली होती बदली

पश्चिम बंगालचे शुभेंदु सरकार यांनी काही दिवसांपूर्वी IPS अधिकारी बुशरा बानो यांची बदली केली होती, ज्यांच्या व्हिडिओवरून अलीकडे वाद निर्माण झाला होता. ही बदली त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओनंतर काही दिवसांनी झाली आहे, ज्याची खूप टीका झाली होती.

IPS डॉ. बुशरा बानो पश्चिम मेदिनीपूरच्या खडगपूरमध्ये अतिरिक्त एसपी म्हणून काम करत होत्या. बदलीनंतर त्यांना स्टेट आर्म्ड पोलिस (SAP)च्या चौथ्या बटालियनचे डेप्युटी कमांडंट म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बानो यांच्या जागी पार्थ घोष आता पश्चिम मेदिनीपूरच्या खडगपूरमध्ये नवीन अतिरिक्त SP पद स्वीकारतील.

बुशरा बानो यांच्या व्हिडिओवरून टीका

बुशरा बानो यांनी UPSC ची तयारी करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्हिडीओ बनवला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अनेक लोकांनी यासाठी त्यांची टीका केली की, त्यांनी व्हिडिओमध्ये ‘जय हिंद’ किंवा ‘वंदे मातरम्’ म्हटले नाही. पण व्हिडीओमध्ये ‘अस्सलाम वालेकुम’ आणि ‘इंशाल्लाह’ अशा शब्दांचा वापर केला आहे.

IPS विरुद्ध कारवाईची मागणी

‘हिंदू लीगल फंड’ नावाच्या एका X हँडलने या व्हिडीओवरून बंगालच्या गृह सचिवांकडे तक्रार करण्याची मागणी केली होती. त्यांच्यावर आरोप लावण्यात आला की, ‘त्यांनी आपल्या व्हिडीओची सुरुवात ‘अस्सलाम वालेकुम’ने केली, मध्ये ‘इंशाअल्लाह’ म्हटले आणि शेवटी ‘जजाकल्लाह’ने केले, पण ‘वंदे मातरम्’ किंवा ‘जय हिंद’चा वापर केला नाही.’ पुढे लिहिले, ‘एक सरकारी अधिकारी निष्पक्ष असावा आणि सार्वजनिक संभाषणात राष्ट्रीय शब्दांचा वापर करावा. आम्ही याबाबत योग्य समीक्षा आणि कारवाईची मागणी करतो.’

Follow Us
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!