IND vs NZ : टीम इंडियाची ताकद वाढली, स्टार खेळाडू फिट घोषित, लवकरच न्यूझीलंडला जाणार

IND vs NZ : न्यूझीलंड दौरा सुरु असताना टीम इंडियाची ताकद वाढली आहे. टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला फिट घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे टेस्ट सीरीजमध्ये फायदा होणार आहे.

IND vs NZ : टीम इंडियाची ताकद वाढली, स्टार खेळाडू फिट घोषित, लवकरच न्यूझीलंडला जाणार
rishabh pant
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 12, 2026 | 1:32 PM

टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा सुरु आहे. सध्या दोन्ही टीम्समध्ये पाच सामन्यांची वनडे सीरीज सुरु आहे. त्यानंतर दोन टेस्ट मॅच होतील. या टेस्ट सीरीजआधी टीम इंडियासाठी एक चांगली बातमी आहे. स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसने (CoE)पूर्णपणे फिट घोषित केलय. फिटनेस क्लियरन्स मिळाल्यामुळे पंत आता 12 नोव्हेंबरला सीरीजसाठी वेलिंग्टनला जाणार आहे. 19 नोव्हेंबरपासून टेस्ट मॅच सुरु होणार आहे. त्यासाठी पंत पूर्णपणे सिलेक्शनसाठी उपलब्ध असेल. रेस्ट ऑफ इंडियाकडून इराणी कप टुर्नामेंटमध्ये खेळताना पंतच्या साइड स्ट्रेनला दुखापत झाली होती. फिटनेस समस्येमुळे त्याला इंडिया ए च्या अनधिकृत टेस्ट मॅचसाठी निवडलं होतं. पण वेळेवर त्याला ‘रिटर्न टू प्ले’ सर्टिफिकेट मिळू शकलं नाही. त्यामुळे तो या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. आता तो पूर्णपणे फिट आहे. लवकरच तो भारताच्या टेस्ट टीमकडून खेळणार आहे.

पंतच्या फिटनेस टेस्टसाठी मेडिकल टीमने कठोर निकष ठेवले होते. त्याने सेंटर ऑफ एक्सीलेंस मध्ये ‘मॅच सिमुलेशन ड्रिल्स’चे दोन्ही टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केले. फलंदाजी करताना त्याला कुठलाही त्रास जाणवला नाही. विकेटकीपिंगची प्रॅक्टिस केल्यानंतर त्याला अधिकृतपणे खेळण्याची परवानगी मिळाली.

Loading...

SENA देशांविरुद्ध त्याने झळकवलीयत शतकं

29 वर्षांचा ऋषभ पंत भारतीय स्क्वॉड मधील अनुभवी मॅच विनर खेळाडू आहे. तो आतापर्यंत 52 टेस्ट मॅच मध्ये खेळलाय. त्यात त्याने 43 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 8 शतकं आणि 21 हाफ सेंच्युरी आहेत. SENA देशांविरुद्ध म्हणजे साऊथ अफ्रीका, इंग्लंड, न्यूजीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध कठीण परिस्थितीत त्याच्या नावावर चांगला प्रभावी रेकॉर्ड आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकच्या भूमीवर त्याने कसोटी सामन्यात शतकं झळकवली आहेत. त्या शिवाय विद्यमान टीममधील निवडक क्रिकेटर्समध्ये न्यूझीलंडमध्ये खेळले आहेत,ज्यात पंतचा सुद्धा समावेश होतो.

टीम इंडिया सध्या सुरु असलेल्या वनडे सीरीजमध्ये 2-0 ने आघाडीवर आहे. टी20 सीरीज आधीच 3-2 ने जिंकली आहे. टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यात अपेक्षेपेक्षा चांगलं प्रदर्शन करत आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us