AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jensen Huang : दिवस फिरले, Nvidia च्या CEO ची रंगीन बाजू आली समोर,कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटसोबत सुद्धा होतं अफेअर

Nvidia चे प्रमुख जेन्सेम हुआंग यांनी मेसेज करून आपले मेगास्पीड इंटरनॅशनल च्या संस्थापक ऐलिस हुआंग हिच्यासोबत अफेअर असल्याचे कबूल केले होते. त्यासोबतच त्याने पत्नीची आणि कुटुंबाची माफी देखील मागितली होती. पण आता Nvidia कंपनीतच त्याचे आणखी एक अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Jensen Huang : दिवस फिरले, Nvidia च्या CEO ची रंगीन बाजू आली समोर,कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटसोबत सुद्धा होतं अफेअर
Jensen Huang Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 12, 2026 | 1:13 PM
Share

जगातील आघाडीच्या चिपनिर्मिती कंपन्यांनपैकी एक असलेल्या Nvidia चे प्रमुख मवैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मेगास्पीड इंटरनॅशनल च्या संस्थापक ऐलिस हुआंग हिच्यासोबत असणारं अफेअर त्याने कबूल केलं होतं. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. पण आता Nvidia कंपनीतीलच एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्यासोबत त्यांचे संबंध असल्याचा दावा समोर आला आहे. या महिलेचं नाव किम्बर्ली असून त्या Nvidia मध्ये आरोग्यविषयक व्यवसायाचा उपाध्यक्ष आहेत. या नव्या वृत्तामुळे कंपनीच्या नेतृत्वाबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

अमेरिकेतली ‘ द न्यूयॉर्क टाईम्स’ च्या वृत्तानुसार जेन्सेन हुआंग आणि किम्बर्ली पॉवेल यांच्यात कथित विवाहबाह्य संबंध होते. या वृत्तासाठी Nvidia मध्ये काम केलेल्या पाच व्यक्तींच्या माहितीचा आधार घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्यापैकी दोघांनी मार्च महिन्यात सॅन जोस येथे झालेल्या Nvidia परिषदेदरम्यान एका हुआंग आणि पॉवेल जवळीक साधताना दिसल्याचा दावा केला. मात्र दावा अद्याप स्पष्ट झालेला नाही.

कोण आहेत किम्बर्ली पॉवेल?

किम्बर्ली पॉवेल या Nvidia मधील वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी 2008 मध्ये कंपनीत काम सुरू केलं.सुरूवातीला त्या उच्च शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील व्यवसाय विकासाशी संबंधित पदावर होत्या. पुढे त्यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता व्यवसाय विकासाच्या वरिष्ठ संचालकपदाची ( Senior Director of Artificial Intelligence Business Development) जबाबदारी सांभाळली. 2017 पासून त्या कंपनीच्या आरोग्यविषयक विभागाच्या उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

हुआंग यांनी आधीच्या प्रकरणाता कबूल केली होती चूक

याआधी जेन्सेन हुआंग यांचा नाव अॅलिस हुआंद या महिलेसोबत जोडण्यात आलं होतं. त्या सिंगापूरमधील डेटा सेंटर कंपनी मेगास्पीडशी संबंधित होत्या. या प्रकरणात परदेशी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित आरोपही समोर आले होते. मात्र चीनने हे आरोप फेटाळले आहेत. हुआंग यांनी 8 नोव्हेंबर रोजी Nvidia कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये पत्नीशी बेवफाई केल्याची कबूली देत कुटुंबाची माफी मागितली होती. महत्त्वाचं म्हणजे, किम्बर्ली पॉवेल यांच्यासोबत कथित संबंधांनंतर Nvidia किंवा संबंधित व्यक्तींकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Follow Us
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक
महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, राऊतांचा..
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, संजय राऊतांचा इशारा; भोजपुरी गाण्यांवरून सरकारला सवाल
मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राऊतांचा
Sanjay Raut : मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर संजय राऊतांचा खोचक टोला; नेमकं काय म्हणाले?
महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...;
Ajit Pawar : महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...; अतुल लोंढेंचा खळबळजनक दावा, विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान नवा राजकीय ट्विस्ट
आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील...
Government Schools : आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील 51 शासकीय संस्थांच्या नामकरणाचा मोठा निर्णय