AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील एक तासात… छठ पूजेची गाणी वाजताच मनसेचा खळ्ळखट्याकचा इशारा

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठ पूजेची गाणी वाजवल्याने मनसेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'पुढील एका तासात गाणी बंद करा, अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देऊ,' असा इशारा मनसे रेल्वे कर्मचारी संघटनेने दिला आहे. ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीनेही 'महाराष्ट्राचे बिहार करू नका' म्हणत या प्रकाराला विरोध केला आहे, ज्यामुळे सांस्कृतिक वादाला तोंड फुटले आहे.

पुढील एक तासात... छठ पूजेची गाणी वाजताच मनसेचा खळ्ळखट्याकचा इशारा
mnsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2026 | 1:07 PM
Share

छठ पूजेच्या निमित्ताने मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर छठ पूजेची गाणी वाजवण्यात आली आहे. त्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचं राजकारण मुंबईत करू नका, असा इशारा दिला आहे. तर आता या वादात मनसेनेही उडी घेतली आहे. पुढील एक तासात ही गाणी बंद झाली पाहिजे. नाही तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा इशाराच मनसेने दिला आहे. त्यामुळे मनसे थेट रेल्वे विरोधातच खळ्ळखट्याक करणार असल्याचा इशारा दिला आहे.

मनसेचे रेल्वे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी हा इशारा दिला आहे. पुढील एक तासात जर ही गाणी बंद झाली नाही तर, रेल्वे अधिकाऱ्यांना मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल. एकाही अधिकाऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे फिरू देणार नाही, असा इशाराच मनसे रेल्वे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिला आहे.

मागणी नसताना गाणी वाजवलीच कशी?

मागणी नसताना छठ पूजेची भोजपुरी गाणी कोणी लावायला सांगितली? याचे उत्तर आम्हाला हवं आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती, मराठी भाषा दिवस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी प्लॅटफॉर्मवर गाणी वाजवा म्हणून सांगण्यासाठी आम्हाला तीन तीन, चार चार वेळा अर्ज करावे लागतात. आणि छठसाठी कोणतीही मागणी नसताना खुशाला गाणी वाजवली जातात? ही गाणी वाजवणं तात्काळ बंद करा, नाही तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा दमच जितेंद्र पाटील यांनी भरला आहे.

मराठी माणसाचा संयम पाहू नका

दरम्यान, मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनीही या मुद्द्यावरून इशारा दिला आहे. महाराष्ट्राचे बिहार करू नका, मराठी माणसाचा संयम पाहू नका, असा इशाराच गोवर्धन देशमुख यांनी दिला आहे. शहरातील सर्वच चौपाट्या, तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून परवानग्या देऊ नका, सार्वजनिक पर्यटनाच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांची गैरसोय थांबवा. बिहारचा हा उत्सव खासगी ठिकाणी साजरा करावा. यात पर्यावरण मंत्र्यांनी लक्ष घालावे, असं आवाहनही गोवर्धन देशमुख यांनी केलं आहे.

डोकं ठिकाणावर आहे का?

मुंबईत रेल्वे स्थानकावर भोजपुरी गाणे लावणाऱ्या रेल्वेचे डोकं ठिकाणावर आहे का? तुम्ही मराठी राज्यात आहात, भानावर या, आम्ही तुमचा निषेध करतो. मुख्यमंत्री महोदय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? महाराष्ट्राचे बिहार का करताय? मतांच्या भिकेसाठी अजून काय काय करणार आहात? मुंबईसह महाराष्ट्र विकायला काढला आहे का? राज्यकर्त्यांनी काय करून ठेवले आहे महाराष्ट्राचे? असे सवालच देशमुख यांनी केले आहेत.

कार्यालयात घुसून…

आता आम्हाला चक्क बिहारमध्ये आणून सोडले आहे. महाराष्ट्रात भाषिक दंगे भडकवू नका, मराठी माणसाचा संयम पाहू नका. रेल्वेने तात्काळ भोजपुरी गाणी बंद करावीत, अन्यथा तुमचे कार्यालयात घुसून आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Follow Us
विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, तटकरेंचा जोरदार हल्लाबोल
Sunil Tatkare On Sanjay Raut : विधानसभेपासून राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलं, सुनील तटकरेंचा जोरदार हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही साधला निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक
महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, राऊतांचा..
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, संजय राऊतांचा इशारा; भोजपुरी गाण्यांवरून सरकारला सवाल
मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राऊतांचा
Sanjay Raut : मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर संजय राऊतांचा खोचक टोला; नेमकं काय म्हणाले?
महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...;
Ajit Pawar : महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...; अतुल लोंढेंचा खळबळजनक दावा, विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान नवा राजकीय ट्विस्ट
आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील...
Government Schools : आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील 51 शासकीय संस्थांच्या नामकरणाचा मोठा निर्णय