AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय होती राजीव गांधी यांची अखेरची इच्छा? सोनिया गांधी यांना कोणती खंत?

Rajiv Gandhi Sonia Gandhi: देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर त्यांच्याशी संबंधित काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्यांची ती अंतिम इच्छा अपूर्णच राहिली आहे. त्याविषयीची खंत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलून दाखवली.

काय होती राजीव गांधी यांची अखेरची इच्छा? सोनिया गांधी यांना कोणती खंत?
काय होती राजीव गांधी यांची अखेरची इच्छा? सोनिया गांधी यांना कोणती खंत?
| Updated on: Nov 12, 2026 | 1:00 PM
Share

Rajiv Gandhi Sonia Gandhi: देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे तामिळनाडू येथील श्रीपेरंबदूर येथील प्रचार सभेदरम्यान LTTE च्या आत्मघाती स्फोटात निधन झाले. 21 मे 1991 रोजी देशाला हादरवणारी ही घटना घडली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्याशी संबंधित काही गोष्टी समोर आल्या. त्यांची अंतिम इच्छाही समोर आली. ती कधीच पूर्ण होऊ शकत नसल्याची खंत आजही सोनिया गांधी यांना आहे. बिलाँगिंगः ए जर्नी ऑफ लव्ह या आत्मकथेतून सोनिया गांधी यांनी मनातील त्या भावना व्यक्त केल्या. त्या संवेदशनशील, भावनिक आणि हळव्या क्षणावर त्या व्यक्त झाल्या.

नेत्रदानाची इच्छा अपूर्णच

सोनिया गांधी यांनी आत्मचरित्रात याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, राजीव गांधी यांच्या अचानक झालेल्या निधाननंतर आणि त्या अत्यंत दुखद प्रसंगात त्यांना एकाएक राजीव गांधी यांचे शब्द आठवले. त्यांच्या एका गोष्टीची आठवण झाली. राजीव गांधी यांनी मृत्यूनंतर नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्याविषयीचा निर्णय घेतला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही डोळे दान करण्याचा संकल्प केला होता. आई प्रमाणेच आपणही नेत्रदान करण्याची राजीव गांधी यांची इच्छा होती. पण या स्फोटाने सगळेच हादरले होते. कोणालाच काही सुचत नव्हते. एका मोठ्या नेत्याला देश मुकला होता. त्याचे अतीव दुःख सर्वांच्या मनात होते. अनेकांना या घटनेने धक्का बसलेला होता.

डॉक्टरांच्या त्या उत्तराने सोनिया गांधी स्तब्ध

या धक्क्यातही सोनिया गांधी यांना राजीव गांधी यांची ती अंतिम इच्छा आठवली. त्यांनी तातडीने घरगुती डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टर माथूर इथं आहेत का? मला त्यांच्याशी तातडीने बोलायचे आहे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असा निरोप त्यांनी धाडला. त्यांनी डॉक्टरांना राजीव गांधी यांच्या अंतिम, अखेरच्या इच्छेची आठवण करून दिली. त्यांना नेत्रदान करायचे होते असे सांगितले.

“नेत्रदान? तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? आता काहीएक उरलेले नाही. काहीही नाही.” डॉक्टरांच्या या उत्तराने सोनिया गांधी निरूत्तर झाल्या. डॉक्टरांच्या या उत्तराने जणू त्यांच्या काळजावर घाव घातला. त्यांना मोठा धक्का बसला. त्यांना एकदम वाईट वाटले. त्यांना श्वास घ्यायलाही कठीण झाले. आता आपण जीवन संपवले पाहिजे असे त्यांना वाटले. आपणही राजीव गांधी यांच्यासोबत असतो आणि त्या स्फोटात गेलो असतो तर बरं झालं असते, असा विचार त्यांच्या मनाला चाटून गेला.

Follow Us
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
Sunil Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनील तटकरे स्पष्टच बोलले; म्हणाले....
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या...
सुजय विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, थोरातांच्या जावयाची उपाध्यक्षपदी वर्णी
संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी....
Hasan Mushrif : संजय शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, हसन मुश्रीफांची मागणी; महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर....
जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान....
Latur : District Bank Voting : जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणधुमाळी; 15 नोव्हेंबरला मतदान, बाजी कोण मारणार?
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक
महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, राऊतांचा..
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, संजय राऊतांचा इशारा; भोजपुरी गाण्यांवरून सरकारला सवाल
मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राऊतांचा
Sanjay Raut : मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर संजय राऊतांचा खोचक टोला; नेमकं काय म्हणाले?
महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...;
Ajit Pawar : महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...; अतुल लोंढेंचा खळबळजनक दावा, विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान नवा राजकीय ट्विस्ट
आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील...
Government Schools : आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील 51 शासकीय संस्थांच्या नामकरणाचा मोठा निर्णय
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट! मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात....
Sharad Pawar : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट! मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित तपासणी; चिंता करण्याचं कारण नसल्याची माहिती