अश्विन, रोहित शर्मा बाहेर, दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

India vs Australia perth Test पर्थ (ऑस्ट्रेलिया): ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिला कसोटी सामना खिशात घातल्यानंतर आता टीम इंडिया दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाली आहे. उद्यापासून पर्थमध्ये सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे पहिल्या कसोटीत महत्त्वाची भूमिका बजावणारा फिरकीपटू आर अश्विनला वगळण्यात आलं आहे. याशिवाय चमकदार कामगिरी करु न शकलेल्या रोहित शर्मालाही टीम […]

अश्विन, रोहित शर्मा बाहेर, दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर
Follow us on

India vs Australia perth Test पर्थ (ऑस्ट्रेलिया): ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिला कसोटी सामना खिशात घातल्यानंतर आता टीम इंडिया दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाली आहे. उद्यापासून पर्थमध्ये सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे पहिल्या कसोटीत महत्त्वाची भूमिका बजावणारा फिरकीपटू आर अश्विनला वगळण्यात आलं आहे. याशिवाय चमकदार कामगिरी करु न शकलेल्या रोहित शर्मालाही टीम इंडियातून बाहेर बसवण्यात आलं आहे. त्याऐवजी अष्टपैलू रवींद्र जाडेजा, हनुमा विहारी यांच्यासह उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार यांना 13 जणांच्या संघात स्थान देण्यात आलं आहे. तर दुखापतग्रस्त पृथ्वी शॉ या कसोटीलाही मुकणार आहे. भारताने पहिला अडलेडचा कसोटी सामना 31 धावांनी जिंकला होता. या कसोटीत आर अश्विनने 6 विकेट घेतल्या होत्या.

अश्विनला दुखापतीमुळे वगळण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दुखापतग्रस्त पृथ्वी शॉ पूर्णत: बरा न झाल्याने तो संघात पुनरागमन करु शकला नाही.

दरम्यान बीसीसीआयने ट्विटर हॅण्डलवर 13 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. पहिल्या कसोटीत 13 जणांमध्ये जाडेजा आणि हनुमा विहारीचं नाव होतं, पण त्यांना अंतिम 11 जणांमध्ये स्थान मिळालं नव्हतं. आता भुवनेश्वर आणि उमेश यादव यांना 13 जणांच्या यादीत स्थान मिळालं आहे.  वाचा:  पृथ्वी शॉ पहिले दोन कसोटी सामने मुकणार

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव.

दुसरा कसोटी सामना पर्थमध्ये उद्यापासून खेळवण्यात येणार आहे.

पृथ्वी शॉला दुखापत

मुंबईकर पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान झेल पकडताना पृथ्वीच्या पायाला दुखापात झाली होती. तो अजूनही फीट नसल्याचं मेडिकल टीमने सांगितलंय. पृथ्वी शॉला मैदानात पाहण्यासाठी आता तिसऱ्या कसोटी सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया इलेव्हन विरुद्ध सराव सामन्यात पृथ्वी झेल घेत असताना त्याच्या पायाला दुखापात झाली होती. त्यानंतर पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी खेळू शकला नव्हता. दुसऱ्या सामन्यासाठी पृथ्वी फीट होईल, अशी आशा भारतीय संघ व्यवस्थापनाला होती. पण पृथ्वीला आणखी एक सामना मुकावा लागणार आहे. आता पृथ्वी शॉ तिसऱ्या कसोटीत खेळेल अशी आशा आहे.