
Rohit Sharma Bold Statement after losing ODI Captaincy : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली. त्यावेळी हे सुद्धा स्पष्ट झालं की, रोहित शर्मा आता भारतीय संघाच्या वनडे टीमचा कॅप्टन नसेल. सिलेक्टर्सनी रोहितला हटवून त्याच्या जागी शुबमन गिलला कसोटी पाठोपाठ वनडे टीमच कर्णधार बनवलं आहे. गिल भारताचा 28 वा वनडे कॅप्टन असेल. शुबमनला हा मान मिळाल्यानंतर रोहित शर्माने पहिलं बोल्ड स्टेटमेंट केलं आहे. रोहित शर्माचं हे स्टेटमेंट ऑस्ट्रेलिया दौरा आणि टीमसाठी आहे.
भारतीय सिलेक्टर्सनी भले रोहित शर्माला वनडे टीमच्या कॅप्टनशिपवरुन हटवलं असेल, पण विराट कोहलीसह त्याचं टीममधील स्थान कायम ठेवलं आहे. असं म्हटलं जातय की, रोहित आणि विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर फेयरवेल सीरीज खेळताना दिसतील. ही तर नंतरची गोष्ट आहे. पण रोहित शर्माने जे म्हटलं, त्यातून त्याची सकारात्मकता दिसून येतं.
‘म्हणूनच मला तिथे खेळायला आवडतं’
“रोहित शर्माने मुंबईत CEAT पुरस्कार सोहळ्यात स्टेटमेंट दिलं. मला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळायला आवडतं. मला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायला मजा येते. ऑस्ट्रेलियन लोकांना क्रिकेट आवडतं. म्हणूनच मला तिथे खेळायला आवडतं” असं रोहित शर्मा म्हणाला.
कॅप्टनशिपचा मुकूट डोक्यावर असो किंवा नसो…
रोहित शर्माच्या या बोल्ड स्टेटमेंटवरुन स्पष्ट आहे की, ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढणार आहेत. कॅप्टनशिपचा मुकूट डोक्यावर असो किंवा नसो पण फलंदाज म्हणून जे त्याला करायचय ते तो करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. सोशल मीडियावर येणारे फोटो आणि व्हिडिओवरुन हे स्पष्ट होतं की,रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्याची किती मनापासून तयारी करतोय.
Fast pitches, bouncers, and the Hitman sending them into the stands! 🔥
Can’t wait to watch him return in action 🔜 in the ODIs vs AUS! 😍 #CEATCricketAwards2025 👉 10th & 11th OCT, 6 PM on Star Sports & JioHotstar pic.twitter.com/2XxweDFlV7
— Star Sports (@StarSportsIndia) October 7, 2025
तु्म्हाला तुमचं बेस्ट द्यावं लागेल
CEAT अवॉर्ड सोहळ्यात रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल स्पेशल अवॉर्ड मिळाला होता. याच सोहळ्यात T20 इंटरनॅशनल बॉलर ऑफ द इयरसाठी निवड झालेल्या वरुण चक्रवर्तीने टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्याबद्दल स्टेटमेंट केलं. “गंभीर यांनी टीममध्ये पराभव मान्य न करण्याचा विचार रुजवला आहे. तु्म्हाला तुमचं बेस्ट द्यावं लागेल. टीमला विजय मिळवून देण्यासाठी मैदानावर सर्व पणाला लावावं लागेल. गंभीर आस-पास असतील, तर तुम्ही साधारण प्रदर्शन करण्याचा विचार करु शकत नाहीत” असं वरुण चक्रवर्ती म्हणाला.