टी-20 मध्ये रोहितचं चौथं शतक, अनेक विक्रम नावावर

| Updated on: Jul 05, 2019 | 5:03 PM

लखनौ : भारतीय संघाने लखनौतील टी-20 सामन्यात विंडीजवर विजय मिळवून दिवाळी साजरी केली. या विजयाचा खरा हिरो ठरला तो कर्णधार रोहित शर्मा. त्याने 58 चेंडूत शतक पूर्ण करत अनेक विक्रम नावावर केले. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये चार शतकं ठोकणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही रोहित शर्मा दुसऱ्या […]

टी-20 मध्ये रोहितचं चौथं शतक, अनेक विक्रम नावावर
Follow us on

लखनौ : भारतीय संघाने लखनौतील टी-20 सामन्यात विंडीजवर विजय मिळवून दिवाळी साजरी केली. या विजयाचा खरा हिरो ठरला तो कर्णधार रोहित शर्मा. त्याने 58 चेंडूत शतक पूर्ण करत अनेक विक्रम नावावर केले. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये चार शतकं ठोकणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आला आहे. रोहित शर्माच्या नावावर 2203 धावा आहेत, तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या मार्टिन गप्टिलच्या नावावर 2271 धावा आहेत.

रोहित शर्माने भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे. विराटच्या नावावर 2102 धावा आहेत. टी-20 मध्ये सर्वाधिक धावा असणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा (2203), विराट कोहली (2102), सुरेश रैना (1605), महेंद्र सिंह धोनी (1487) आणि युवराज सिंह (1177) हे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

रोहित शर्माला या सामन्यातील खेळीबद्दल सामनावीराचा मान देण्यात आला. रोहितच्या नेतृत्त्वातील या मालिकेत भारतीय संघ 2-0 ने आघाडीवर आहे.

या विजयासह भारताने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपल्या यशाचा आलेख वाढताच ठेवला. 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका आणि वन डे मालिका गमावल्यानंतर भारताने आतापर्यंत एकही वन डे मालिका आणि टी-20 मालिका गमावलेली नाही.

लखनौतील नव्याने तयार झालेल्या मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात आला. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी असं या मैदानाचं नामकरण करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 सामना होस्ट करणारं हे देशातलं 22 वं मैदान ठरलं.