T20 WC 2024 : रोहित शर्माने कर्णधारपदाबाबत मौन सोडलं, म्हणाला…

Rohit Sharma On Captaincy : मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात पत्रकार परिषद पार पडली. रोहित शर्माने या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तर दिली. रोहित कॅप्टन्सीबाबत काय म्हणाला?

T20 WC 2024 : रोहित शर्माने कर्णधारपदाबाबत मौन सोडलं, म्हणाला...
Press Conference Rohit Sharma,Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 11:02 PM

रोहित शर्मा आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्मा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2022 नंतर या छोट्या फॉर्मेटपासून दूर होता. रोहितनंतर हार्दिक पंड्या याला टीम इंडियाच्या टी 20 टीमची कॅप्टन्सी देण्यात आली. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिककडे जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे हार्दिकलाच पूपर्णवेळ टी 20 टीमचं कर्णधारपद देण्यात असल्याची चर्चाही रंगली. त्यानंतर आयपीएलच्या 17 व्या मोसमात रोहितला हटवून हार्दिक पंड्या याला मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद देण्यात आलं. त्यामुळे हार्दिकच्या नेतृत्वात खेळणारा रोहित वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. हार्दिक आयपीएलमध्ये ज्या भूमिकेत आहे, त्या भूमिकेत रोहित वर्ल्ड कपमध्ये असणार आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची 30 एप्रिल रोजी घोषणा करण्यात आली. त्यानंतर 2 दिवसांनी 2 मे रोजी बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि रोहित शर्मा या दोघांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. रोहितला या पत्रकार परिषदेत कॅप्टन्सीबाबत प्रश्न विचारण्यात आला. “तु पुन्हा कर्णधाराच्या भूमिकेत असणार आहेस, दीर्घकाळानंतर अनुभव कसा असेल? असा प्रश्न विचारण्यात आला. रोहितने यावर काय म्हटलं जाणून घेऊयात.

“हा आपल्या जीवनाचा भाग आहे. सर्वकाही तुमच्या मनानुसार होणार नाही. माझ्या कारकीर्दीत अनेक कर्णधारांच्या नेतृत्वात खेळलोय. त्यामुळे माझ्यासाठी हे काय नवीन नाही. तुमच्यासाठी जे काही आहे, ते स्वीकारावं. टीमसाठी जे आवश्यक आहे, ते तुम्हाला खेळाडू म्हणून करावं लागेल. मी गेल्या महिन्यापासून हेच करायचं प्रयत्न करतोय”, असं रोहितने म्हटलं.

रोहित शर्मा काय म्हणाला?

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान

Non Stop LIVE Update
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.