AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अरे, शरम वाटली पाहिजे, आपण कोणाचे..’, मुस्लिमांच्या लांगूलचालनावरुन फडणवीसांचा ठाकरेंवर संताप

"म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक टिपू सुल्तान जयंती साजरी करणं सुरु केलं. त्यांच्या रॅलीत अल्लाहू अकबरचे नारे दिले, हे चुकीचच होतं. हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हे खपवून घेतल नसतं. आता त्यांचं लांगुलचालन या स्तराला पोहोचलय की, मुंबईच्या बॉम्बस्फोटातला आरोपी त्यांचा स्टार प्रचारक बनलाय"

'अरे, शरम वाटली पाहिजे, आपण कोणाचे..', मुस्लिमांच्या लांगूलचालनावरुन फडणवीसांचा ठाकरेंवर संताप
Devendra fadnavis
| Updated on: May 17, 2024 | 1:22 PM
Share

लोकसभा निवडणुकीत पाचव्या टप्प्याच्या मतदानाला दोन दिवस उरले आहेत. महाराष्ट्रात प्रचार शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. प्रत्येक निवडणुकीत एक वोट शिफ्टिंग बघायला मिळतं. यावेळी मुस्लिम मत उद्धव ठाकरेंकडे जातायत. मराठी प्लस मुस्लिम मतांच्या बेरजेमुळे भाजपा नेते उद्धव ठाकरेंवर तुटून पडलेत का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेत झालेला बदल समजावून सांगितला.

“मराठी माणूस कवेळ मराठी नाहीय. तो हिंदू देखील आहे, तो कट्टर हिंदू आहे. मूळामध्ये उद्धव ठाकरेंनी एक प़ॉलिटिकल अर्थमॅटिक मांडलं. उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं, मुंबईत आपला मराठी मतांचा टक्का कमी झालाय, याची भरपाई कुठून करता येईल, त्यावेळी मुस्लिम मतांवर त्यांचं लक्ष गेलं. मुस्लिमांच लांगुलचालन केलं, त्यांना पायघड्या घातल्या. त्यांच्या पायावर लोळण घातली की, भरपाई करता येईल असं उद्धव ठाकरेंना वाटतं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘अरे, शरम वाटली पाहिजे, कोणाचे सुपूत्र आहोत आपण’

“म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक टिपू सुल्तान जयंती साजरी करणं सुरु केलं. त्यांच्या रॅलीत अल्लाहू अकबरचे नारे दिले, हे चुकीचच होतं. हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हे खपवून घेतल नसतं. आता त्यांचं लांगुलचालन या स्तराला पोहोचलय की, मुंबईच्या बॉम्बस्फोटातला आरोपी त्यांचा स्टार प्रचारक बनलाय” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. “त्या पलीकडे उद्धव ठाकरेंच्या उबाठा सेनेच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे. अरे, शरम वाटली पाहिजे, कोणाचे सुपूत्र आहोत आपण. त्यावर साधा निषेधाचा शब्द नाही, स्पष्टीकरण नाही, हे लांगुलचालन स्पष्टपणे दिसतय. मी स्पष्टपण सांगतो निवडणूक आम्ही जिंकणार आहोत, पण अशी वेळ आली असती, एखादी निवडणूक हरावी लागतेय, म्हणून पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिराव लागेल, मी निवृत्ती घेतली असती” असं देवेद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना