AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर

शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या ‘त्या’ निर्णयाने… फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर

| Updated on: Aug 17, 2026 | 7:05 PM
Share

शिवसेनेचे वाशिमचे खासदार संजय देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस बजावण्यात आली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी दाखल केलेल्या बंडखोरीविरोधी याचिकेवर 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता सुनावणी होणार आहे. सुनावणीला गैरहजर राहिल्यास अनुपस्थितीतच निर्णय दिला जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

शिवसेनेचे वाशिमचे खासदार संजय देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. खासदारांच्या बंडखोरीविरोधात शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात ही नोटीस आहे. संजय देशमुख हे बंडखोरी करत उद्धव ठाकरे यांची साथ सोडून दुसऱ्या गटात सामील झाले होते.

संजय देशमुख यांच्यासह सहा खासदारांनी बंडखोरी केल्याचा आरोप करत अरविंद सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता सुनावणी होणार आहे. ही सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या नोटिसीमध्ये स्पष्ट निर्देश दिले आहेत की, सुनावणीच्या वेळी खासदार संजय देशमुख उपस्थित राहिले नाहीत, तर त्यांच्या अनुपस्थितीतच या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली जाईल. त्यामुळे संजय देशमुख यांना या सुनावणीला हजर राहणे बंधनकारक आहे. या प्रकरणाच्या निकालावर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी उलथापालथ घडवू शकतो.

Published on: Aug 17, 2026 07:05 PM

Follow Us