AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hema Malini : सनी देओलच्या ‘बटवारा 1947’वर हेमा मालिनींची प्रतिक्रिया; दिला खास संदेश

सनी देओलचा 'बटवारा 1947' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटातील माणुसकी, प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश अनेकांना भावला आहे. खासदार हेमा मालिनींनीही या चित्रपटाचं 'अत्यंत उत्कृष्ट' म्हणत कौतुक केलं. त्यांनी सनी देओलच्या अभिनयाची प्रशंसा करत सामाजिक सलोख्याची गरज अधोरेखित केली. हा चित्रपट द्वेषापेक्षा प्रेमाची निवड करण्यास शिकवतो, असं त्या म्हणाल्या.

Hema Malini : सनी देओलच्या ‘बटवारा 1947’वर हेमा मालिनींची प्रतिक्रिया; दिला खास संदेश
हेमा मालिनी यांना कसा वाटला सनी देओलचा चित्रपट ?
| Updated on: Aug 17, 2026 | 10:14 PM
Share

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा बहुचर्चित ‘बटवारा 1947’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बऱ्याच लोकांना हा चित्रपट आवडला असून त्याचं खूप कौतुकही केलं जात आहे. 14 ऑगस्टला रिलीज झालेल्या या चित्रपटाने अनेकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या चित्रपटात माणूसकी, प्रेम आणि धार्मिक सीमांच्या पलीकडे जाणारा परस्पर बंधुभावाचा संदेश देण्यात आला असून आहे. अभिनेत्री , खासदार हेमामालिनी (Hema Malini)  यांनीही नुकताच हा चित्रपट पाहिला असून त्यांनी सनी देओलच्या पिक्चरचं भरभरून कौतुक केलं आहे. पिक्चरमधून देण्यात आलेल्या मेसेजबद्दलही त्या बोलल्या.

हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरील अकाऊंटवरून आपली प्रतिक्रिया दिली. या चित्रपटाला “अत्यंत उत्कृष्ट” (simply brilliant) असं म्हणत त्यांनी कौतुक केलं. हा चित्रपट लोकांना द्वेष आणि विभाजनापेक्षा माणुसकी व प्रेमाची निवड करण्यास शिकवतो, असं त्यांनी म्हटलं. हा चित्रपट पाहून लोकांच्या विचारसरणीत सकारात्मक बदल होईल आणि ते एकमेकांशी आणखी दयाळूपणे वागतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हेमा मालिनी यांना कसा वाटला चित्रपट ?

मी हा चित्रपट नुकताच पाहिला आणि मला तो खूपच प्रभावी वाटला, असं त्यांनी लिहीलं. ‘बटवारा 1947’ हा केवळ कथा सांगत नाही, तर आजच्या समाजासाठीही हा चित्रपट एक महत्त्वाचा संदेश देतो, असं त्यांनी नमूद केलं. देशाला सध्या माणुसकी, सन्मान आणि सामाजिक सलोख्याची गरज असल्याचंही हेमा मालिनी यांनी लिहीलं.

सनी देओल, शबाना आझमी यांच्या अभिनयाचे कौतुक

हेमा मालिनी यांनी चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचंही भरभरून कौतुक केलं. त्यांनी विशेषतः सनी देओल आणि शबाना आझमी यांच्या अभिनयाची खूपच प्रशंसा केली. याशिवाय करण देओल आणि प्रीती झिंटा यांनीही आपल्या भूमिका चांगल्या प्रकारे साकारल्याचे हेमामालिनी यांनी पोस्टमध्ये आवर्जून म्हटलं. एवढ्या छान चित्रपटाचे दिग्दर्शन केल्याबद्दल त्यांनी राजकुमार संतोषी यांचंही अभिनंदन केलं. तसंचआजच्या काळात गरजेचा असलेला सामाजिक संदेश देणारा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणल्याबद्दल त्यांनी निर्माता आमिर खान यांचंही कौतुक केलं.

फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे कथा

‘बटवारा 1947’ची कथा फाळणीच्या काळावर आधारित आहे. या चित्रपटात सनी देओल, शबाना आझमी, करण देओल आणि प्रीती झिंटा यांच्यासोबत अली फजल, अभिमन्यू सिंह, खुशी हजारे, कनिका कपूर, वसीम राजपूत आणि ईशा संधीर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. असगर वजाहत यांच्या प्रसिद्ध नाटक ‘जिस लाहौर नई वेख्या, ओ जम्या ई नई’ यापासून हा चित्रपट प्रेरित असल्याचं सांगितलं जातं. 14 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी