AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती अंघोळीला गेली, अंगावर पाण्याऐवजी ॲसिड पडलं आणि किंकाळी..

अंगावर पाणी पडताच ती मुलगी गंभीररित्या भाजली. जखमी अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून पाण्याऐवजी बादलीत ॲसिड कोणी आणि का ठेवलं ? याचा शोध सुरू आहे.

ती अंघोळीला गेली, अंगावर पाण्याऐवजी ॲसिड पडलं आणि किंकाळी..
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: May 17, 2024 | 1:27 PM
Share

हैदराबादच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. तेथील एका विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार घडला. अंघोळीला गेलेल्या विद्यार्थिनीच्या अंगावर पाण्याऐवजी ॲसिड पडलं आणि ती वाईटरित्या होरपळली. ICFAI युनिव्हर्सिटीमध्ये बीटेकच्या अंतिम वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला. पीडित विद्यार्थिनी हॉस्टेलच्या बाथरूममध्ये अंघोळीला गेली होती, मात्र तेथील बादलीत पाण्याऐवजी कोणीतरी ॲसिड ठेवले होते. ते शरीरावर पडताच ती होरपळून जखमी झाली. तिला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, 16 मे रोजी विद्यापीठाच्या चौथ्या मजल्यावर ही खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण कॅम्पसमधील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ॲसिडमुळे ती विद्यार्थिनी गंभीररित्या भाजल्याचे पीडितेच्या मित्रांचे म्हणणे आहे. तिच्यावर उपचार सुरू असले तरी तिची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, बाथरूममधीर त्या बादलीत पाण्याऐवजी ॲसिड कोणी आणि का ठेवले होते, हे अद्याप समजू शकलेले नाही. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी आपल्या अधिकृत निवेदनात ॲसिड हल्ल्याची शक्यता नाकारली आहे. या घटनेची आम्ही सखोल चौकशी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. बादलीत कोणतेही ऍसिड नव्हते. उलट गरम पाण्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाल्याचा दाव पोलिसांनी केला. मात्र त्यामुळे आता खरं काय , खोटं काय याचा संभ्रम निर्माण झाला आहे.

ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास सुरू आहे. पण ज्या विद्यापीठात ही दुर्दैवी घटना घडली त्या विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. रुग्णालयात संबंधित पीडितेच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...