Rohit Sharma : रोहित शर्माची गौतम गंभीर विरोधात बंडखोरी का? CSK विरुद्ध सामन्यानंतर उचललं असं पाऊल

Rohit Sharma : टीम इंडियातून नुकतच अभिषेक नायर यांना असिस्टेंट कोचच्या पदावरुन हटवण्यात आलं. यामागे टीममधील अंतर्गत राजकारण असल्याची चर्चा आहे. आता यानंतर रोहित शर्माने अशी कृती केलीय की, त्याकडे गौतम गंभीर यांच्याविरोधात रोहित शर्माची बंडखोरी म्हणून पाहिलं जात आहे.

Rohit Sharma : रोहित शर्माची गौतम गंभीर विरोधात बंडखोरी का? CSK विरुद्ध सामन्यानंतर उचललं असं पाऊल
Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 22, 2025 | 9:06 AM

रोहित शर्माची बॅट अखेर आयपीएल 2025 मध्ये तळपली. मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 9 विकेट राखून शानदार विजय मिळवला. या मॅचमध्ये रोहित शर्माने नाबाद 76 धावा फटकावून महत्त्वाच योगदान दिलं. या इनिंगनंतर रोहित शर्माने असं काही केलय की, त्याकडे गौतम गंभीर विरोधात बंडखोरी किंवा त्यांना उत्तर दिलं, म्हणून पाहिलं जात आहे. रोहित शर्माने चेन्नई विरोधात हाफ सेंच्युरी झळकवल्यानंतर इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. यात अभिषेक नायरचे आभार मानले. रोहित शर्माने आपल्या फलंदाजीच क्रेडिट अभिषेक नायर यांना दिलं. आता याकडे वरकरणी पाहिलं, तर रोहितच्या फलंदाजीत सुधारणेसाठी अभिषेक नायर यांनी मदत केली असं वाटेल. पण यामागचा खेळ वेगळा आहे.

रोहित शर्माने अभिषेक नायर यांचे आभार मानणं याकडे गौतम गंभीर यांच्यावर निशाणा साधणं म्हणून पाहिलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार अभिषेक नायर यांचं टीम इंडियापासून वेगळं होणं रोहित शर्माला आवडलेलं नाही. कारण अभिषेक नायर रोहित शर्माचे निकटवर्तीय मानले जातात. हे जाहीर आहे, अभिषेक नायर यांना हटवण्यासाठी बैठक झाली. त्यात गौतम गंभीर सहभागी असणार. असं म्हटलं जातय की, सपोर्ट स्टाफमधील एका महत्त्वाच्या सदस्याला अभिषेक नायर टीम इंडियात नको होते. अखेरीस नायर यांना बाहेर करण्यात आलं. आता रोहितने नायर यांचे आभार मानून विरोधकांना उत्तर दिलं आहे.


गोष्टी रुळावर येतील अशी केकेआरला अपेक्षा

दरम्यान अभिषेक नायर यांनी कोलकाता नाइट रायडर्समध्ये पुन्हा एकदा आपली सेवा सुरु केली आहे. मागच्यावर्षी केकेआरला चॅम्पियन बनवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. बीसीसीआयच्या रिव्यू मीटिंगनंतर नायर यांना टीमसाठी अनफिट मानण्यात आलं. पण केकेआरला अभिषेक नायर यांची क्षमता माहित आहे. केकेआरच प्रदर्शन सध्या चांगलं होत नाहीय. नायर यांच्या परतण्याने गोष्टी रुळावर येतील अशी केकेआरला अपेक्षा आहे.