RR vs PBKS IPL 2023 | अरे रे..! शिखर वाचला रे.. आर. अश्विनने अशी घेतली शाळा Watch Video

आयपीएल 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सकडून खेळत असलेल्या आर. अश्विननं गोलंदाजी करताना शिखर धवनची फिरकी घेतली. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

RR vs PBKS IPL 2023 | अरे रे..! शिखर वाचला रे.. आर. अश्विनने अशी घेतली शाळा Watch Video
RR vs PBKS IPL 2023 | अरे रे..! शिखर धवन वाचला रे.. आर. अश्विनने अशी घेतली शाळा
Image Credit source: Twitter
| Updated on: Apr 05, 2023 | 9:18 PM

मुंबई – राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल 2023 स्पर्धेतील आठवा सामना सुरु आहे. तर दोन्ही संघाचा स्पर्धेतील दुसरा सामना आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांची धडपड सुरु आहे. दरम्यान पहिल्या डावात पंजाब किंग्सचे फलंदाज राजस्थानच्या गोलंदाजांवर भारी पडले. प्रभसिमरन सिंग आणि शिखर धवन या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 90 धावांची भागीदारी केली. शिखर धवनने 36 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. मात्र एक क्षण असा आला की आर. अश्विनने धवनची फिरकी घेतली.

नॉन स्ट्राईक एंडला उभ्या असलेल्या शिखर धवनने लवकर क्रिस सोडलं. मग काय मंकडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या आर. अश्विन गोलंदाजी करताना थांबला. मग आता आपला बळी जातो की काय अशा अविर्भावात शिखर धवन चाचपडला. क्रिसमध्ये परतण्यासाठी धडपड करू लागला. पण आर. अश्विनने तशी काही विकेट घेतली नाही. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएल 2019 च्या पर्वात आर. अश्विनकडे पंजाब किंग्सची जबाबदारी होती. पंजाबनं 185 धावांचं आव्हान दिलं होतं. या सामन्यात राजस्थानकडून जोस बटलर एकहाती लढा देत होता. त्याने 43 चेंडूत 69 धावा केल्या होत्या. मात्र आर. अश्विनच्या मंकडिंगमुळे तो बाद झाला. ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’ आहे की नाही याबाबत आजही चर्चा रंगते.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, सॅम कुरान, सिकंदर रझा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

इम्पॅक्ट प्लेयर्स – ऋषी धवन, अथर्व तायडे, हरप्रीत सिंग भाटिया, मॅथ्यू शॉर्ट, मोहित राठी

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन) : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल

इम्पॅक्ट प्लेयर्स – ध्रुव जुरेल, आकाश वसिष्ठ, मुरुगन अश्विन, कुलदीप यादव, डोनाव्हॉन फरेरा