Sachin Tendulkar: मला कधीच स्वातंत्र्य दिलं नाही…इतक्या वर्षांनंतर सचिन तेंडुलकरांकडून बीसीसीआयबद्दल खळबळजनक खुलासा

Sachin Tendulkar On BCCI: सचिन तेंडुलकरांनी नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. बीसीसीआयबद्दल त्यांनी जे सांगितले त्याची आता चर्चा रंगली आहे.

Sachin Tendulkar: मला कधीच स्वातंत्र्य दिलं नाही...इतक्या वर्षांनंतर सचिन तेंडुलकरांकडून बीसीसीआयबद्दल खळबळजनक खुलासा
| Updated on: Nov 05, 2026 | 12:51 PM

Sachin Tendulkar On BCCI: सचिन तेंडुलकर एक महान फलंदाज म्हणून ओळखला जातो, पण कर्णधार म्हणून त्याचा प्रवास चांगला नव्हता. दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, तेंडुलकरने १९९० च्या दशकात दोन वेगवेगळ्या प्रसंगी भारतीय संघाचे नेतृत्व केले, पण कर्णधार म्हणून त्याला फारसे यश मिळाले नाही. आता सचिनने बीसीसीआयबद्दल एक अशी गोष्ट सांगितली आहे ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

मंगळवारी रेडिटवरील ‘आस्क मी एनीथिंग’ (Ask Me Anything) सत्रादरम्यान, तेंडुलकरने आपल्या कर्णधारपदाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आणि आपल्या आवडत्या भारतीय कर्णधारांची नावेही सांगितली.  “कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणे हा एक मोठा सन्मान होता. पण मला माझा संघ निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य कधीच नव्हते. आजची बीसीसीआय ही १९९० च्या पेक्षा खूपच अधिक व्यावसायिक संस्था आहे. त्या काळात भारतीय क्रिकेटही एका खूप वाईट टप्प्यातून गेले होते.”

Loading...

सचिनचा आवडता कर्णधार कोण?

आपल्या २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, सचिन तेंडुलकर कृष्णमाचारी श्रीकांतपासून ते एम.एस. धोनीपर्यंत अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळला. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या या खेळाडूने सौरव गांगुली आणि एम.एस. धोनी यांना आपले आवडते कर्णधार म्हणून निवडले. सचिन तेंडुलकर म्हणाला, “माझ्या आवडत्या कर्णधारांबद्दल बोलायचे झाल्यास, सौरव गांगुली आणि एम.एस. धोनी निश्चितपणे माझ्या यादीत अग्रस्थानी असतील.”

आपल्या २४ वर्षांच्या एकदिवसीय कारकिर्दीत सचिन तेंडुलकरने सहा विश्वचषकांमध्ये सहभाग घेतला. विश्वविजेता होण्यासाठी त्याला बराच काळ वाट पाहावी लागली. २०११ मध्ये एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली त्याचे हे स्वप्न साकार झाले. दरम्यान, सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २००३ च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. सचिन स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, पण ट्रॉफी जिंकण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

सचिनकडून बावुमाचेही कौतुक

सचिन तेंडुलकरने टेंबा बावुमाच्या कर्णधारपदाचेही कौतुक केले. तो म्हणाला की,” मला टेंबा बावुमाच्या जिद्दीचे खूप कौतुक वाटते. त्याने जबाबदारी स्वीकारून संघाचे नेतृत्व केले आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटसाठी उत्कृष्ट निकाल दिले. दक्षिण आफ्रिकेने आयसीसी विजेतेपद जिंकणे ही जागतिक क्रिकेटसाठी एक मोठी गोष्ट आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us