Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने पाण्याने धुतली बॅट, पाहा मजेशीर व्हिडीओ

Viral video : काल सचिनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल केला आहे.

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने पाण्याने धुतली बॅट, पाहा मजेशीर व्हिडीओ
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने पाण्याने धुतली बॅट, पाहा मजेशीर व्हिडीओ
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 14, 2022 | 7:52 AM

भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडूलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर अनेक विक्रम (Record) आहेत. देशभरात सचिनने चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळल्यामुळे त्याचे सगळीकडे चाहते आहेत. सोशल मीडियावर (Social Media) त्याचे लाखो चाहते आहेत, त्याने केलेल्या चांगल्या गोष्टी आत्तापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आयपीएलमध्ये सुद्धा मुंबई इंडियन्स टीमला सल्लागार म्हणून आजही महत्त्वाची भूमिका बजावताना सचिन दिसतो.


काल सचिनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यामध्ये तो त्याच्या चाहत्यांना एक गोष्ट सांगत आहे. बरं त्याने हेही सांगितलं आहे की, ‘हे मला असं कर म्हणून कोणी सांगितलेलं नाही’. सचिन त्याच्या बॅटचावरचा भाग एका पाण्याने धूत आहे. त्यावेळी बॅटच्या इतर ठिकाणी पाणी जाऊ नये यासाठी तो काळजी घेत आहे.

समजा बॅट धुताना बॅटच्या इतर ठिकाणी पाणी गेलं तर बॅट पटकन खराब होते. त्यामुळे सचिन घ्यावयाची काळजी सुद्धा सांगत आहे.

सद्या सचिन वर्ल्ड रोड सेफ्टी सीरीज खेळत आहे, तिथले सुद्धा अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काल सुरेश रैना आणि इरफान पठानचा एक गाणे गात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.