Sara Tendulkar: बर्थडेच्याच दिवशी सारा झाली ट्रोल, कुटुंबासोबत वाढदिवस सेलिब्रेट तर केला पण… Video Viral

Sara Tendulkar Birthday: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी, सारा तेंडुलकरचा काल वाढदिवस होता, तिने काल तिचा २९ वा वाढदिवस साजरा केला.

Sara Tendulkar: बर्थडेच्याच दिवशी सारा झाली ट्रोल, कुटुंबासोबत वाढदिवस सेलिब्रेट तर केला पण... Video Viral
| Updated on: Oct 13, 2026 | 10:56 AM

Sara Tendulkar Birtday Celebration: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी, सारा तेंडुलकरचा काल वाढदिवस होता, तिने काल तिचा २९ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तिने तिच्या मैत्रीणींसोबत तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला. वाढदिवसाच्या दिवशी साराने तिच्या कुटुंबासोबत तिचा वाढदिवस साजरा केला.

सारा आणि तेंडुलकर कुटुंबाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक गोष्टीने सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. कुटुंबाने एकत्र साराचा बर्थडे सेलिब्रेट केला पण जाताना मात्र वेगवेगळ्या कारमधून ते घरी गेले. एकट कुटुंबातील लोक एकाच घरात राहत असूनही वेग वेगळे का गेले असा सवाल आता चाहत्यांना पडला आहे.

Loading...

सारा तेंडुलकरचा लूक साधा आणि कॅज्युअल होता. साराने तिच्या कुटुंबासोबत जेवणासाठी सलवार सूट परिधान केला होता. तिने मोकळे केस आणि सिंपल मेकअप केला होता. पुन्हा एकदा, तिने आपल्या साध्या लूकने प्रेक्षक आणि चाहत्यांची मने जिंकली. दरम्यान, सचिन तेंडुलकर मुलगी सारा तेंडुलकरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पत्नी अंजलीसोबत दिसला. ते त्यांच्या स्वतःच्या गाडीत बसलेले दिसले. सचिन आणि अंजलीचा लूक खूपच आकर्षक होता.

वृत्तानुसार, सारा तेंडुलकरची एकूण संपत्ती आणि कमाई कोट्यवधी रुपयांची असल्याचा अंदाज आहे. सारा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिचे ९८ लाख फॉलोअर्स आहेत, जिथे ती पोस्ट शेअर करून मोठी रक्कम कमावते. याशिवाय, ती स्वतःचा ऑनलाइन व्यवसायही चालवते. मॉडेलिंग व्यतिरिक्त, ती फॅशन ब्रँड्ससोबतही काम करते, ज्यामुळे तिला लक्षणीय उत्पन्न मिळते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साराची एकूण संपत्ती ५० लाख ते १ कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे.

 

साराची स्वत:ची पिलेट्सची अॅकेडमीही आहे. अंधेरीतील लोखंडवाला परिसरातही अॅकेडमी आहे. ती स्वत: न्यूट्रिशियनिस्ट आहे. तिने लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतले आहे. महिलांचे मानसिक आरोग्य आणि काही समस्या असल्यास त्यावर या अॅकेडमी सोडवल्या जातील, व्यायाम, निरोगी आयुष्यासाठी महिलांनी जागरुक रहावे असे सारा नेहमी म्हणतं असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us