Shikhar Dhawan चा हुमा कुरेशीसोबतचा रोमँटिक फोटो व्हायरल, जाणून घ्या यामागचे रहस्य

सोशल मीडियावर नेटकरी अधिक चर्चा करीत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यापासून दोघांचे चाहते वेगळा तर्क लावत आहेत.

Shikhar Dhawan चा हुमा कुरेशीसोबतचा रोमँटिक फोटो व्हायरल, जाणून घ्या यामागचे रहस्य
Shikhar Dhawan चा हुमा कुरेशीसोबतचा रोमँटिक फोटो व्हायरल, जाणून घ्या यामागचे रहस्य
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 13, 2022 | 8:51 AM

आत्तापर्यंत अनेक क्रिकेटर (Cricket) आणि बॉलिवूडच्या अभिनेत्रीच (Bollywood Actress) फोटो व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर नेटकरी अधिक चर्चा करीत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यापासून दोघांचे चाहते वेगळा तर्क लावत आहेत.

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांचा ‘डबल एक्सएल’ हा चित्रपट पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे. त्यामुळे त्याची चर्चा आत्तापासून आहे. सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी या दोघी ‘डबल एक्सएल’ चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. विशेष म्हणजे व्हायरल झालेला फोटो हा ‘डबल एक्सएल’ चित्रपटातील एक सीन असल्याची माहिती एका वेबसाईट दिली आहे.

शिखर धवनला ज्यावेळी या चित्रपटात काम करण्याची संधी देण्यात आली, त्यावेळी त्याने विचार करुन या चित्रपटाला होकार दिला होता. विशेष म्हणजे एखाद्या खेळाडूचं आयुष्य एकदम व्यस्त असतं. परंतु शिखर धवनने त्याला अधिक वेळ दिला आहे.

ज्यावेळी हा चित्रपट रिलीज होईल, त्यावेळी धवनचा तो सीन तुम्हाला पाहायला मिळणार आहे.