
भारत-पाकिस्तान सामन्यावेळी शोएब अख्तरच विश्लेषण नेहमी चर्चेचा विषय असतं. पाकिस्तान जिंकांव अशी त्याची मनापासून इच्छा असते. पण असं कधी होत नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरचा पडणारा चेहराच सर्वकाही सांगून जातो. यावेळी सुद्धा असच घडलय. पाकिस्तानच्या पराभवानंतर टीव्ही शो मध्ये बसलेल्या शोएब अख्तरने पाकिस्तानी टीमच्या चुकाच दाखवल्या नाहीत, तर त्याने वॉर्निंग सुद्धा दिली. त्याने सलमान आगा अँड कंपनीला म्हटलं की, ‘भारत एक मजबूत संघ आहे. ते तुम्हाला मारणारच’ शोएब अख्तरचा इशारा पाकिस्तानी टीमच्या चुकीकडे होता, स्पिनर्सशी संबंधित ही चूक आहे.
वेगवान गोलंदाजी पाकिस्तानची ताकद आहे. भारताविरुद्ध आशिया कप 2025 च्या सामन्यात पाकिस्तानी टीमने 4 स्पिनर्स खेळवले. पाकिस्तानी टीममध्ये पेसरच्या नावावर फक्त शाहीन शाह आफ्रिदी होता. शोएब अख्तरची जगातील वेगवान गोलंदाजांमध्ये गणना व्हायची. पाकिस्तानी टीमची चूक दाखवून देत त्याने विचारलं की, ‘भारतीय टीममध्ये असा एकतरी फलंदाज आहे की, जो स्पिन खेळू शकत नाही’
‘…आणि ते धोपटणार सुद्धा’
शोएब अख्तर म्हणाला की, “स्पिन भारतीय फलंदाजांची ताकद राहिली आहे. अशावेळी त्यांच्या विरोधात जास्त स्पिनर्स खेळवणं ही स्वत:च्या पायावर कुऱ्हाडी चालवण्यासारखं आहे. ही पक्की टीम इंडिया आहे, ते स्पिन गोलंदाजी चांगल्या पद्धतीने खेळू शकतात आणि ते धोपटणार सुद्धा”
‘…तर मार खात रहाल’
पाकिस्तानी टीममध्ये वेगवान गोलंदाजांच्या नसण्याने शोएब अख्तर हैराण झाला. तसच भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं. पाकिस्तानी टीमला त्यांच्या चुकीची किंमत चुकवावी लागली आहे. शोएब अख्तरतने वॉर्निंग दिलीय की, ‘पुढेही असच राहिलं,तर मार खात रहाल’
सिक्स मारुन विजयाची स्क्रिप्ट लिहिली
आशिया कप 2025 मध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानने प्रथम फलंदाजी घेतली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 25 चेंडू राखून 128 धावांच लक्ष्य पार केलं. भारताने तीन विकेट गमावले. भारतासाठी सूर्यकुमार यादवने सिक्स मारुन विजयाची स्क्रिप्ट लिहिली.