
भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) ही नेहमीच चर्चेच्या झोतात असते. तिचा खेल असो किंवा वैयक्तिक आयुष्य, तिने घेतलेले निर्णय, तिचं वक्तव्य, मुलाखती, स्पॉटलाइट नेहमी तिच्यावर असतो. काही वर्षांपासून ती वैयक्तिक आयउष्यामुळे जास्त चर्चिली गेली. सानिया आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaiab Malikयांचा विवाह मोडला, त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली आणि ते वेगळे झाले. त्यानतंर मूव्ह ऑन करत शोएबने लगेच दुसरा विवाह केला. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी तो साधारण वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाला. मात्र काही काळाने त्यांच्यातही कुरबुरी सुरू असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. एवढंच नव्हे तर ते दोघेही घटस्फोट घेणार असल्याचेही वृत्त समोर आले होते. गेल्या कित्ये काळापासून ते दोघे सार्वजनिक समारंभा, एखाद्या इव्हेंटमध्ये एकत्र स्पॉट झालेले नाहीत.
मात्र याच दरम्यान आता या जोडप्याने, शोएब आणि सना यांनी एक मोठा कारनामा केला आहे. चर्चेतल्या या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस अतिशय दिमाखात आणि रोमँटिक अंदाजात साजार केल्याचे समोर आले आहे. शोएब मलिकने त्याची पत्नी, अभिनेत्री सनासोबतचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते पाहून चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
शोएबने शेअर केले फोटो
त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसा निमित्त, शोएब मलिकने त्याची पत्नी सना जावेदसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले. या फोटोंमध्ये या जोडप्याचा ग्लॅमरस अवतार स्पष्टपणे दिसत आहे. “माझ्या सुंदर जोडीदाराला दुसऱ्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, नेहमीच सोबत राहू.” अशी कॅप्शनही त्याने या फोटोंसोबत दिली आहे. या फोटोंवर सना जावेद हिने रिॲक्शन दिली असून प्रेमाची कबुली दिली. या फोटोंत दोघे दुबईतील आलिशा व्हेन्यूवर डिनरचा आनंद घेताना दिसले.
साधारण दोन वर्षांपूर्वी, म्हणजे जानेवारी 2024 मध्ये शोएब मलिक आणि सना जावेद यांच्या लग्नाचे फोटो झळकल्यानंतर सगळ्या जगाला मोठा धक्का बसला. त्यावेळी शोएब आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्यातील मतभेदाच्या बातम्या जोरात सुरू होत्या, आणि तेव्हाच ही बातमी धडकली. त्यानंतर असा खुलासा झाला की सानियाने शोएबकडून ‘खुला’ (घटस्फोटाचा एक प्रकार) घेतल्याचे उघड झाले. शोएबचं हे ( सना जावेद) तिसरं लग्न असून सना हिचं दुसरं लग्न असल्याची माहितीही समोर आली. याआधी तिचा निकाह लग्न गायक उमेर जसवालशी होता.
लोकांच्या प्रतिक्रिया समोर
लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्ता शोएब-सनाने शेअर केलेल्या फोटोंवर लोकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. शोएब आणि सनाच्या चाहत्यांनी त्यांना अभिनंदन केले, तर सानिया मिर्झाच्या समर्थकांनी शोएबला त्यांच्या मागील नात्याची आठवण करून दिली. पण शोएब आणि सना या सर्व वादांपासून दूर आनंदी जीवन जगत आहेत. शोएब आणि सनाच्या घटस्फोटाच्या बातम्या पूर्णपणे खोट्या होत्या आणि त्यात काहीही तथ्य नाही असंही बरेच लोक आता म्हणत आहेत.
सानिया मिर्झाची नवी पार्टनरशिप
सना आणि शोएबच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी, सानिया मिर्झाने लोटो सोबत नवीन भागीदारीची घोषणा केली आहे, त्याची कॅप्शनही खूप मजेशीर आहे. “जेव्हा योग्य जोडीदार (पार्टनर्स) एकत्र येतात तेव्हा तो नेहमीच जिंकणारा सामना असतो.” असं तिने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे.