Shoaib Malik | तू सानियाचा विश्वासघात केलास, दुसरा निकाह करताच नेटकऱ्यांची शोएबला लाखोली

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाबद्दल विविध बातम्या, अफवा सुरू असतानाच शोएबने पुन्हा लग्न केल्याने सर्वांना धक्का बसला आहे. त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जेव्हा लोकांना त्याच्या नवीन लग्नाबद्दल समजलं तेव्हा त्यांनी ट्विटरवर विविध कमेंट करण्यास सुरुवात केली.

Shoaib Malik | तू सानियाचा विश्वासघात केलास, दुसरा निकाह करताच नेटकऱ्यांची शोएबला लाखोली
| Updated on: Jan 20, 2024 | 1:42 PM

लाहोर | 20 जानेवारी 2024 : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाबद्दलच्या बातम्या अजून थंडही झाल्या नव्हत्या तोच शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. त्याने अचानक पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. शोएबने स्वतः त्याच्या ट्विटर आणि इंस्टाग्राम हँडलवर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. मात्र, हे फोटो जेव्हा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होऊ लागले, तेव्हा सुरुवातीला लोकांचा त्यावर विश्वास बसला नाही. लोकांना वाटले की कदाचित हे फोटो खोटे आहेत. पण नंतर जेव्हा त्यांची खात्री पटली तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले.

शोएब मलिकने पुन्हा लग्न केल्याची लग्नाची बातमी समजताच ट्विटरवर एकच गोंधळ माजला. सध्या शोएब मलिक आणि सानिया मिर्झा दोघंही सोशल मीडियावर ट्रेडिंग आहेत. लोकांनी शोएब मलिकच्या फोटाोंवर कमेंट्सचा भडिमार केला आहे. काहींनी तर त्याला थेट सुनावलंच आहे. तू सानियाचा विश्वासघात केलास. दुसरा निकाह करताच नेटकऱ्यांनी शोएबला लाखोली वाहिली आहे. त्याला भरपूर ट्रोल केलं जात आहे. तर काही युजर्स मजेशीरपणे असेही म्हणत आहेत की ‘शोएब मलिकने पुन्हा लग्न केले आहे. पण बाबर आझम अजूनही सिंगलच फिरत आहे.

 

 

 

 

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी 2010 साली लग्न केले होते. तेव्हा या लग्नावरून बराच गदारोळ झाला होता. सानियाने एका पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न केल्यामुळे लोकांनी बराच गोंधळ घातला होता, तिच्यावर बरीच टीकाही झाली होती.