AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Breaking : स्मृती मानधनाच्या लग्नात आक्रित घडलं… अचानक नातेवाईकाला आला हार्ट अटॅक; लग्न रद्द होणार?

सांगलीची कन्या आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना यांचा शाही विवाह सोहळा आज 23 नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटामाटात पार पडत आहे. त्यापूर्वी स्मृतीच्या कुटुंबातील व्यक्तीला हार्ट अटॅक आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लग्न रद्द होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Big Breaking : स्मृती मानधनाच्या लग्नात आक्रित घडलं... अचानक नातेवाईकाला आला हार्ट अटॅक; लग्न रद्द होणार?
Smriti MandhanaImage Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Nov 23, 2025 | 3:43 PM
Share

अख्ख्या देशाचं लक्ष लागलेल्या क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या लग्नाला अवघे काही तास उरले आहेत. दुपारचा मुहूर्त असल्याने लग्नाची पूर्ण तयारी झाली आहे. फक्त सनई चौघड्यांचा आवाज कानी पडणं तो काय बाकी आहे. ही तयारी सुरू असतानाच काळजात धस्स करणारी बातमी समोर आली आहे. लग्नाला अवघे काही तास बाकी असतानाच स्मृतीच्या एका नातेवाईकाला अचानक हार्ट अटॅक आला. त्यामुळे या नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मानधनासह त्यांचं संपूर्ण कुटुंब रुग्णालयात दाखल झालं आहे. त्यामुळे मानधनाचा विवाह सोहळा रद्द होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

स्मृती आणि पलाश यांचा विवाह दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सांगलीत होणाऱ्या या विवाह सोहळ्यासाठी क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातल्या मान्यवर हजर झाले आहेत. या लग्न सोहळ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट टीमचे खेळाडू अधिचं दाखल झाले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, सौरभ गांगुली, व्ही व्ही लक्ष्मण, सोनू निगम,मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील या लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे सांगलीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलं असून स्मृती मंधानाच्या फार्महाऊसला छावणीचं स्वरुप आलं आहे.

काय घडलं?

मात्र ही तयारी सुरू असतानाच लग्नात एक आक्रित घडलं आहे. स्मृती मंधानाच्या जवळच्या नातेवाईकाला हृदयविकाराचा झटका आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नातेवाईकाला हार्ट अटॅक आल्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका मागवण्यात आली आणि नातेवाईकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सांगलीच्या समडोळी येथील मानधना फार्म हाऊसवरच लग्नाची तयारी सुरू असताना या नातेवाईकाला अटॅक आल्याचं सांगितलं जात आहे.

खासगी रुग्णालयात उपचार सुरु

या नातेवाईकाला उपचारासाठी सांगलीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णालयात स्मृतीसह तिच्या कुटुंबातील सर्वच जण दाखल झाले आहेत. तसेच वऱ्हाडी मंडळीही रुग्णालयात पोहोचले आहेत. या नातेवाईकाची प्रकृती चिंताजनक असल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर चिंतेचं सावट पसरलं आहे.

पाहुण्यांना परत पाठवलं जातंय

स्मृतीचा होणारा नवरा आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छलही रुग्णालयातच आहे. मात्र, नातेवाईकाची प्रकृती अधिकच बिघडल्याचं सांगितलं जात आहे. दुपारनंतर फॉर्म हाऊसची सजावट काढण्याचं काम सुरू झालं आहे. लग्नाचं संपूर्ण डेकोरेशन काढलं जात आहे. तसेच लग्नाच्या ठिकाणी येणाऱ्या पाहुण्यांना परत पाठवलं जात आहे. त्यामुळे स्मृतीचा विवाह सोहळा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, लग्न होणार की नाही? याबाबत मानधाना कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, ज्या पद्धतीने डेकोरेशन काढलं जात आहे आणि पाहुण्यांना परत पाठवलं जात आहे, त्यावरून विविध कयास लावले जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...