IND vs NZ: मैत्रीवगैरे सगळं बाहेर, मैदानात उतरलात की…मॅचनंतर श्रेयस अय्यरने कोणाला मारला टोमणा?
Shreyas Iyer On Team India: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे सामन्यांची मालिका पार पडली जी भारतीय संघाने जिंकली. आता यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला ते पाहा...

IND vs NZ ODI Series: माउंट माउंगानुई येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यात भारतीय संघाने २२ धावांनी रोमांचक विजय मिळवत मालिका ३-१ ने जिंकली. टी-२० मालिका जिंकल्यानंतर, भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांमध्येही किवी संघाला पराभूत केले. या प्रभावी मालिका विजयानंतर, भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने एक महत्त्वपूर्ण विधान केले. श्रेयस अय्यर मालिका जिंकण्याचे क्रेडिट कोणाला दिले ते पाहा..
श्रेयस अय्यर काय म्हणाला?
सामन्यानंतर बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला की, “टी-२० आणि एकदिवसीय दोन्ही मालिका जिंकणे हा एक रोमांचक अनुभव होता. ज्या प्रकारे आमच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि प्रसंगाला साजेशी कामगिरी केली, ते कौतुकास्पद आहे. कमी धावसंख्येमुळे सामना काही वेळा आव्हानात्मक बनला होता, पण संघाने कोणतीही सबब सांगितली नाही. आम्हाला फक्त मैदानात उतरून आमचे सर्वोत्तम प्रदर्शन करायचे होते आणि खेळाडूंनी ते करून दाखवले.”
श्रेयस अय्यरने न्यूझीलंडमधील प्रचंड पाठिंब्याबद्दल प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले. तो म्हणाला, “दोन्ही संघांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते स्टेडियममध्ये आलेले आम्ही पाहिले आणि त्यांच्या प्रेमाबद्दल व पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मैदानाबाहेर मैत्रीपूर्ण वातावरण असले पाहिजे, तर आतमध्ये मात्र ती एक लढाईच असली पाहिजे.”
पाचव्या एकदिवसीय सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना भारताचा संघ २०९ धावांवर सर्वबाद झाला आणि न्यूझीलंडसमोर २१० धावांचे माफक लक्ष्य ठेवले. मात्र, भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत किवी संघाला ४८.१ षटकांत केवळ १८७ धावांवर सर्वबाद केले. भारताने हा सामना २२ धावांनी जिंकून या दौऱ्याचा यशस्वी शेवट केला.
भारतीय संघाची या मालिकेतील कामगिरी पाहिली तर काही विशेष नव्हती. भारतीय फलंदाजांची कामगिरी तर पाहण्यासारखीही नव्हती. रोहित शर्मा, विराट कोहली ज्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या त्यांनी अपेक्षाभंग केला. या मालिकेत गोलंदाजांनी विशेष कामगिरी केली. गोलंदाजांनी ही मालिका खऱ्या अर्थाने गाजवली. मालिकवीरचा पुरस्कारही एका गोलंदाजालाच मिळाला. गुरुनूर ब्रारला मालिकावीरचा पुरस्कार मिळाला.