Shubman Gill: दुखापतीमुळे गिलचा पत्ता कट होणार, संघाला मिळणार नवीन कर्णधार, कोण असणार?

Shubman Gill Replacement Captain: शुभमन गिलला दुखापत झाली असून आता संघाचा नवीन कर्णधारपद कोण असणार याचे नाव बीसीसीआय लवकरच घोषित करेल.

Shubman Gill: दुखापतीमुळे गिलचा पत्ता कट होणार, संघाला मिळणार नवीन कर्णधार, कोण असणार?
| Updated on: Sep 26, 2026 | 3:20 PM

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामन्याच्या अवघ्या दोन दिवस आधी, २५ सप्टेंबर रोजी, सराव सत्रादरम्यान भारतीय संघाला एक वाईट बातमी मिळाली. नेटमध्ये फलंदाजी करत असताना उजव्या कोपराला चेंडू लागल्याने भारतीय कर्णधार शुभमन गिल जखमी झाला.

नेट सरावादरम्यान, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा एक अचूक लांबीचा चेंडू शुभमन गिलच्या उजव्या कोपराला थेट लागला. गिल वेदनेने विव्हळला आणि ताबडतोब नेटमधून बाहेर पडला. जवळच फलंदाजी करत असलेले विराट कोहली आणि गोलंदाज सिराज यांनी त्याची विचारपूस करण्यासाठी तात्काळ धाव घेतली. भारतीय संघाच्या फिजिओथेरपिस्टने तात्काळ त्याच्या कोपराची तपासणी करून त्यावर पट्टी बांधली. त्यानंतर गिल डगआऊटमध्ये आपला कोपर धरून बसलेला दिसला आणि संपूर्ण सत्रात त्याने पुन्हा फलंदाजी केली नाही.

मागील मालिकेतही बोटाला दुखापत झाल्याचे वृत्त होते. शुभमन गिलला मालिकेपूर्वी सलग दुसऱ्यांदा दुखापत झाली आहे. गेल्या महिन्यात, श्रीलंका दौऱ्यादरम्यान, कसोटी मालिकेच्या अगदी आधी नेट्समध्ये सराव करताना त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. मात्र, तो वेळेवर बरा झाला आणि दोन्ही कसोटी सामने खेळू शकला. यावेळी, पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्यास अजून २४ तासांपेक्षा जास्त वेळ शिल्लक आहे, संघ व्यवस्थापन त्याच्या बाबतीत कोणताही मोठा धोका पत्करू इच्छित नाही.

जर शुभमन गिलची दुखापत थोडी जरी गंभीर असल्याचे आढळले आणि त्याला पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली, तर संघात दोन मोठे बदल पाहायला मिळतील. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत, संघाचा उपकर्णधार केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. केएल राहुलला एकदिवसीय कर्णधारपदाचा मोठा अनुभव आहे. त्याने आतापर्यंत १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले असून, त्यात १० विजय आणि ५ पराभव आहेत. गिल संघाबाहेर असल्याने, युवा स्फोटक फलंदाज यशस्वी जैस्वाल रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us