खुन्नस खुन्नस.. तुझी नी माझी खुन्नस! शुबमन गिल- हार्दिक पंड्यामध्ये उडाला खटका ? Video ने चर्चांना उधाण

30 मे रोजी आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव केला. मात्र याच सामन्यादरम्यान एक आश्चर्यकारक घटना घडली. गुजरातचा कर्णधार शुभमन गिल आणि मंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्यामध्ये असं काही घडलं, ज्यामुळे आता दोघांमध्ये काही ठीक नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

खुन्नस खुन्नस.. तुझी नी माझी खुन्नस! शुबमन गिल- हार्दिक पंड्यामध्ये उडाला खटका ? Video ने चर्चांना उधाण
शुबमन गिल- हार्दिक पंड्या
Image Credit source: PTI
| Updated on: May 31, 2025 | 11:31 AM

आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात 30 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध, मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी केली आणि 20 धावांनी विजय मिळवला. या विजयासह त्यांनी क्वॉलिफायर-2 मध्ये प्रवेश केला. आता 1 जूनला, म्हणजे उद्या त्यांचा सामना रोजी पंजाब किंग्जशी होणार आहे. गुजरातचा संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. याचदरम्यान शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये, टॉसनंतर गिलने हार्दिक पंड्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. मुंबईचा कर्णधार असलेल्या हार्दिकने त्यांच्या हँडशेक करण्याचा प्रयत्न केला, पण गिलने हातन मिळवा नाहीत, यउलट तो पुढे सरकला. या व्हिडीओनंतर आता त्यांच्यात काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या असून त्याच्या दुरावा आलाय का असा सवालही चाहते विचारतान दिसत आहेत.

गिल-पंड्यामध्ये नेमकं झालं तरी काय ?

खरंतर, मुल्लानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात शुभमन गिलने टॉस केला, हार्दिक पंड्याने हेड म्हटले आणि तो टॉस जिंकला. यानंतर गिल मागे हटला आणि हार्दिकला पुढे येऊ दिले. सहसा नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराला प्रथम बोलवलं जातं आणि प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची याचा निर्णय त्याला जाहीर करावा लागतो. नाणेफेक झाल्यानंतर गिल बाजूला जात असताना हार्दिकने हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न केला. पण गिलने त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. काही चाहत्यांच सं म्हणणं हे की गिल तसं मुद्दाम वागला, त्याने जाणूनबुजून हस्तांदोलन केले नाही. गिल आणि हार्दिकमध्ये संघर्ष सुरू झाल्याचा दावाही काहींनी केलाय. पण, टॉसपूर्वी मात्र ते दोघेही एकत्र फोटो काढताना आणि हसत-हसत एकमेकांशी बोलत असताना दिसले.

Shubman Gill Hardik Pandya handshake controversy hardik celebrated aggressively after dismissal of shubaman in GT vs MI eliminator

हार्दिकने दिलं असं प्रत्युत्तर

मात्र शुबमन गिलच्या या वागण्यामुळे हार्दिक पंड्या दुखावल्या गेल्याचं दिसतंय. कारण दुसऱ्या डावात, पहिल्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर गिल बाद झाला. ट्रेंट बोल्टने त्याचा बळी टिपला. गिल बाद झाल्यावर पंड्याने अतिशय आक्रमक पद्धतीने आनंद साजरा केला. तो अतिशय वेगाने धावत आला आणि गिलच्या पुढे गेला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते. आधी गिल जे वागला, त्याला त्याने अशा पद्धीतने प्रत्युत्तर दिलं. मात्र त्याची प्रतिक्रिया आश्चर्यकारक होती. काही वेळातच त्याच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळेच अनेक चाहत्यांना आता असं वाटतंय की या दोघांमधील संघर्ष सुरू झाला आहे.

 

मुंबईमुळे गुजरात स्पर्धेबाहेर

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 229 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात, गुजरातने 13.3 षटकांत 3 गडी गमावून 151 धावा केल्या. त्यामुळे सामना खूपच रोमांचक झाला होता. पण 14 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने वॉशिंग्टन सुंदरची विकेट घेतली आणि तिथूनचा डाव फिरला, सामना मुंबईकडे झुकू लागला. सुंदर बाद होताच धावांची टांकसाळ थांबली आणि गुजरातने सतत विकेट गमावण्यास सुरुवात केली. शेवटी, गुजरातला 20 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.