Maharashtra Kesari : सिकंदर शेख आणि महेंद्रसिंग गायकवाड पुन्हा कुस्तीच्या मैदानात भिडणार ? या ठिकाणी होणार कुस्ती

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान महेंद्रसिंग गायकवाड यांच्यात सुरू झालेल्या कुस्तीच्या वादावर पडदा टाकण्यासाठी सांगलीची अंबाबाई तालीम संस्था पुढे आली आहे.

Maharashtra Kesari : सिकंदर शेख आणि महेंद्रसिंग गायकवाड पुन्हा कुस्तीच्या मैदानात भिडणार ? या ठिकाणी होणार कुस्ती
maharashtra kesari
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Jan 18, 2023 | 8:58 AM

सांगली – पुण्यात (Pune) झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर (Maharashtra Kesari) वादाला सुरुवात झाली होती. स्पर्धा संपल्यापासून सोशल मीडियावर अन्याय झाल्याचा सूर अनेकांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पंचांना धमकी दिल्याचा प्रकार देखील उघडकीस आला होता. पण “त्या”वादावर पडदा टाकण्यासाठी पैलवान सिकंदर शेख (sikandar shaikh) आणि महेंद्रसिंग गायकवाड (Mahendrasingh gaikwad) यांच्यात सांगलीत लवकरच मातीतील कुस्ती होणार आहे. विशेष म्हणजे या कुस्तीसाठी अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे वस्ताद यांनी पुढाकार घेतला आहे.

Sikandar-Shaikh

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने पैलवान सिकंदर शेख आणि पैलवान महेंद्रसिंग गायकवाड यांच्यात सुरू झालेल्या कुस्तीच्या वादावर पडदा टाकण्यासाठी सांगलीची अंबाबाई तालीम संस्था पुढे आली आहे. पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्रसिंग गायकवाड यांच्यात सांगलीत मातीतील कुस्ती आयोजित करण्यात येणार असल्याचे अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे वस्ताद यांनी जाहीर केले आहे. यासाठी पैलवान सिकंदर शेख याने तयारी दर्शवली असून महेंद्रसिंग यांच्याशी बोलणी सुरू असून लवकरचं सांगलीमध्ये मातीतील कुस्ती पार पडेल आणि सध्या सुरु असलेल्या वादावर तोडगा निघेल असा विश्वास वस्ताद संजय भोकरे यांनी व्यक्त केला आहे.

कुस्ती मैदान