स्मृती मानधना कॅप्टन होताच संघात पडली फूट? मॅचनंतर हरमनप्रीत कौरने असं काय केलं की Video Viral

Smriti Mandhana And Harmanpreet Kaur : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात वनडे मालिका रंगली जी भारतीय संघाने जिंकली. पण सामना जिंकल्यानंतर एका वेगळ्या गोष्टीने लक्ष वेधून घेतले.

स्मृती मानधना कॅप्टन होताच संघात पडली फूट? मॅचनंतर हरमनप्रीत कौरने असं काय केलं की Video Viral
| Updated on: Oct 29, 2026 | 2:04 PM
Smriti Mandhana And Harmanpreet Kaur: भारतीय महिला क्रिकेट संघाने झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिका ३-० अशी खिशात घालून विजय मिळवला. मैदानावर मुलींनी आपल्या खेळाची जादू दाखवत चाहत्यांची मनं जिंकली, पण मालिका विजयाच्या या जल्लोषात एका वेगळ्याच घटनेने सर्वांचे लक्ष वेधले गेले. टीम इंडियाच्या दोन दिग्गज खेळाडू कर्णधार स्मृती मानधना आणि अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौर यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला अशी चर्चा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरू झाली आहे. ड्रेसिंग रूममध्ये दोघींमध्ये काही बिनसलंय का? अशी चर्चा आधीपासूनच रंगत होती. मॅचनंतर हरमनप्रीत आणि स्मृती या दोघींनीही एकमेकींना शेकहॅण्ड केलं नाही.
मॅच संपल्यानंतर नेहमीप्रमाणे सर्व खेळाडू विजयाचा सेलिब्रेशन करत एकमेकींचे अभिनंदन करत होत्या. यादरम्यान, हरमनप्रीत कौर स्मृती मानधनाजवळ आली, पण काही कारणास्तव तिचे लक्ष दुसरीकडे वेधले गेले आणि स्मृतीनेही तिच्याकडे लक्ष दिलं नाही. सरळ सरळ इग्नोर झाल्याने दोघींमध्ये हँडशेक होऊ शकले नाही.
हा व्हिडिओ अवघ्या काही सेकंदांचा होता, पण या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. दोघींमध्ये ऑल इज वेल नाहीये का?” अशा शंका क्रिकेट चाहत्यांनी उपस्थित केल्या आहेत. मात्र, या केवळ अफवा आहेत की खरंच काही बिनसलं आहे याबाबत अद्याप दोघींकडून कोणतीही माहिती अधिकृतरित्या समोर आलेली नाही.
याच मालिकेत, विशेषतः झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीत कौरने स्फोटक खेळी खेळली होती. तुफान फॉर्म दाखवत १२१ चेंडूंमध्ये धमाकेदार १२६ धावांची शतकी खेळी केली होती. भारतीय संघ अडचणीत असताना हरमनने केलेल्या कामगिरीचे कौतुक ड्रेसिंग रूममध्ये सर्वांनीच केली. विशेष म्हणजे, हरमनचे ते शतक झाल्यावर स्मृती मानधनाने स्वतः जागेवरून उठून टाळ्या वाजवत तिचे कौतुक करताना दिसली.
जर दोघींमध्ये काही बिनसलं असतं, तर मैदानावरील तो उत्साह आणि आनंद लपून तर राहिला नसता. व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाल्यामुळे या चर्चेला अधिक उधाण आले आहे.
Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us