AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sankarshan Karhade : त्यांच्या अंगावर कपडा नव्हता, ते आईला म्हणाले, सुनबाई तुम्ही…संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला आजोबांचा भावुक प्रसंग

Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडेनं एका मुलाखतीत आजोबांचा प्रसंग सांगितला आहे.

Sankarshan Karhade : त्यांच्या अंगावर कपडा नव्हता, ते आईला म्हणाले, सुनबाई तुम्ही...संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला आजोबांचा भावुक प्रसंग
| Updated on: Oct 29, 2026 | 2:58 PM
Share

मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या आयुष्यातील अनेक घडामोडी सांगतो. तसेच आपले अनुभवही शेअर करतो. संकर्षणचं त्याच्या आई–वडिलांशी घट्ट नातं आहे. त्यांच्याबद्दल अनेकदा संकर्षण बोलतो. अशातच आता एका मुलाखतीत अभिनेत्यानं त्याच्या आजोबांचा प्रसंग सांगितला आहे. आजोबा बेडरिडन असताना खाली पडले होते, याबद्दल संकर्षणने सांगितलं आहे.

संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला प्रसंग

संकर्षण कऱ्हाडे म्हणाला की, ‘माझे आजोबा आधीच बेडरीडन होते आणि ते पडले. ते पडल्यावर तिथेच त्यांना लघवी झाली आणि त्या थारोळ्यात ते पडले होते. त्यावेळी मी फिजिक्सच्या प्रॅक्टिकल मध्ये होतो. मला तेव्हा फोनवर सतरा अठरा मिस कॉल आले. त्यावेळी नवीनच फोन आलेले. माझ्याकडे तेव्हा रिलायन्सचा फोन होता. छोटासा 1800 रुपयाचा फोन होता. प्रॅक्टिकल मध्ये 17- 18 मिस कॉल बघून मी आईला विचारलं, काय झालं एवढे मिस कॉल का? ती मला म्हणाली की, आजोबा पडले. मी तिला म्हणालो मग तू उचल ना त्यांना. तर ती मला म्हणाली की, ती अंगाला हात लावू देत नाहीयेत.’

‘का तर त्यांच्या अंगावर कपडा नव्हता. ते आईला म्हणाले की, ‘सुनबाई तुम्ही समोर येऊ नका मी लाजेने मरून जाईन.’ म्हाताऱ्या माणसाला दोन-तीन गोष्टींचा त्रास असतो. एक तर मला दोन-तीन माणसांचा आधार घ्यावा लागतोय. दुसरं म्हणजे माझ्या अंगावर एकही कपडा नाही . तिसरं म्हणजे, मी अशा अवस्थेत असताना माझी सून समोर आहे. त्यावेळी त्यांच्या मनाची काय घालमेल सुरू असेल.’ असं संकर्षणने पुढे सांगितलं. ‘अभिजात मराठी’ला दिलेला मुलाखतीमध्ये संकर्षण कऱ्हाडेनं हा किस्सा सांगितला आहे.

दरम्यान, संकर्षण कऱ्हाडेच्या कामाबद्दल सांगायचं तर अभिनेता अशोक सराफ यांच्यासोबत ‘आदि अनंत‘ या सिनेमात झळकणार असून हा सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.  या सिनेमाचं दिग्दर्शन महेश लिमये यांनी केलं असून कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडेनं लिहिले आहेत.

Follow Us
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!
महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
Mahayuti Meeting Update : महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर...
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षदा देशमुख-जाधव यांचे मोठे विधान
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला...
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला... ज्येष्ठ नेत्याचं सुचक विधान
महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा...
Ravindra Dhangekar vs Navnath Ban : महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा पलटवार
महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
Sanjay Raut on MLC Election Results 2026 : महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांचा आरोप...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांच्या आरोपांनी राजकारणात खळबळ!
भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा....
Anand Paranjpe : भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा; आनंद परांजपेंचा पलटवार
रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत?
Navnath Ban : रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत? नवनाथ बन यांचा थेट सवाल
एकनाथ शिंदेंनी धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
Navnath Ban : पुणे पदवीधर निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी; एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?