AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smriti Mandhana: मैदानात पिरियड आले, अंगावर पांढरा ड्रेस, स्मृती मानधनाने सांगितला तो अनुभव, अम्पायरने थेट…काय घडलं होतं?

Smriti Mandhana: सध्या सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये स्मृतीने भर मैदानात क्रिकेटचा सामना खेळत असताना मासिक पाळी आल्याचा अनुभव सांगितला आहे.

Smriti Mandhana: मैदानात पिरियड आले, अंगावर पांढरा ड्रेस, स्मृती मानधनाने सांगितला तो अनुभव, अम्पायरने थेट...काय घडलं होतं?
Smriti MandanaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 10, 2026 | 4:27 PM
Share

पूर्वीच्या काळी महिलांना मासिक पाळीच्या वेळी प्रचंड त्रास सहन करायला लागायचा. त्यांना एका कोपऱ्यात ४ दिवस बसवले जायचे. त्यांना खाण्यासाठी आणि पिण्यासाठी वेगळ्या गोष्टी दिल्या जायच्या. तसेच झोपण्यासाठी त्यांना वेगळे अंथरुण दिले जायचे. मात्र आता काळ पूर्णपणे बदलला आहे. मासिक पाळीच्या काळात माहिला नेहमी जी सर्व कामे करते ती सर्व कामे ती करत असते. असाच मासिक पाळीच एक अनुभव भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाने सांगितला आहे.

नेमकं काय घडलं?

सध्या सोशल मीडियावर स्मृती मानधनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने टेस्ट मॅच सुरू असताना असलेल्या मासिक पाळीचा अनुभव सांगितला आहे. क्रिकेटचा सामना सुरु असताना अचानक पोटात दुखू लागलं आणि मासिक पाळी आली. त्यात तिचा ड्रेस पांढरा असल्यामुळे तिला अम्पायरला ब्रेक देण्यासाठी विनंती केली होती. कारण तिच्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. स्मृतीच्या बाबतीत अम्पायरने स्वतःचा निर्णय घेतला पण तरी अशी परिस्थिती इतर महिला क्रिकेटरसाठी क्रिकेटचे नियम काय आहेत? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

क्रिकेटचे नियम काय सांगतात?

क्रिकेटचे नियम MCC द्वारे राखले जातात आणि ICC च्या प्लेइंग कंडिशन्सद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर लागू केले जातात.

-एखादा क्रिकेटचा खेळाडू ८ मिनिटांपेक्षा जास्त वेळ मैदानाबाहेर राहिल्यास पूर्ण अनुपस्थिती कालावधीसाठी गोलंदाजी दंड लागू होतो. बॉलरसाठी तो जितका वेळ बाहेर तितका वेळ त्याला बॉलिंग करता येत नाही. म्हणजे तो 30 मिनिटं बाहेर गेला तर 30 मिनिटं बॉलिंग नाही.

-बॅटर स्वेच्छेने क्रीज सोडल्यास तो “रिटायर्ड आउट” मानला जातो आणि फक्त विरोधी कर्णधाराच्या संमतीने परत येऊ शकतो.

-जर एखादा खेळाडू जखमी झाला, आजारी पडला किंवा इतर पूर्णपणे स्वीकारार्ह कारणाने मैदान सोडू शकतो.

मासिक पाळीला “आजार” मानायचे का, याबाबत नियमांमध्ये अस्पष्टता आहे. सध्या क्रिकेटमध्ये फक्त कॉन्कशन सबस्टिट्यूट (२०१९ पासून) उपलब्ध आहे. 2019 पासून लागू करण्यात आलेल्या नियमानुसार आता डोक्याला किंवा मेंदूला गंभीर दुखापत झाली तरच पूर्ण खेळाडू बदलता येतो.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा