T20 World Cup 2022 : श्रीसंतच्या मुलीने विराट कोहलीसारखा शॉट मारला, तुम्ही व्हिडीओ पाहिला का ?

श्रीशांतने ट्विटरवरती एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्याची मुलगी क्रिकेट खेळत आहे.

T20 World Cup 2022 : श्रीसंतच्या मुलीने विराट कोहलीसारखा शॉट मारला, तुम्ही व्हिडीओ पाहिला का ?
T20 World Cup 2022
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 28, 2022 | 2:32 PM

मुंबई : T20 विश्वचषक (T20 World Cup 2022) सुरु झाल्यापासून टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे अधिक चर्चेत आहेत. विराट कोहली (Virat Kolhi), सुर्यकुमार यादव हे दोन फलंदाज अधिक चर्चेत आहेत. कारण दोघांनी आशिया चषकापासून चांगली खेळी केली आहे. तसेच सगळेचं क्रिकेटर सोशल मीडियावर अधिक सक्रीय आहेत. तिथं आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी ते शेअर करीत असतात.

श्रीसंतने ट्विटरवरती एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्याची मुलगी क्रिकेट खेळत आहे. विराट कोहलीने मारलेल्या एका षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तशी श्रीशांतची मुलगी क्रिकेट खेळत असल्याचं श्रीशांतने म्हटलं आहे.

दोन मॅचमध्ये विराट कोहलीने गोलंदाजांची चांगली धुलाई केली आहे. ज्या पद्धतीने विराटने शॉट्स खेळले आहेत. त्याचपद्धतीने शॉट्स खेळण्याचे प्रयत्न माझी मुलगी करीत आहे. सध्या ती क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे क्रिकेटची नवी पिढी एकदम मजबूत होईल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2007 साली विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात लढत झाली होती. त्यावेळी अंतिम ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करुन श्रीसंतने टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता.