T20 WC 2022: टीम इंडियाचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत, मॅचबाबत अधिक माहिती वाचा एका क्लिकवर

नेदरलॅंडविरुद्ध सुद्धा काल झालेल्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी उत्कृष्ट खेळी केली.

T20 WC 2022: टीम इंडियाचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत, मॅचबाबत अधिक माहिती वाचा एका क्लिकवर
T20 World Cup 2022Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 12:41 PM

मेलबर्न : ऑस्ट्रेलियात (Australia) विश्वचषक स्पर्धेला (T20 World Cup 2022) सुरुवात झाल्यापासून अनेक क्रिकेटचे चाहते सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. क्रिकेटच्याबाबत एखादी घटना घडली, किंवा क्रिकेटची एखादी माहिती उघडकीस जरी आली, तरी त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु होते. पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचा (Team India) शेवटच्या ओव्हरपर्यंत संघर्ष पाहायला मिळाला. अखेरच्या चेंडूवर टीम इंडियाचा फिरकीपटू आर.आश्विनने विजयी चौकार लगावला.

नेदरलॅंडविरुद्ध सुद्धा काल झालेल्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी उत्कृष्ट खेळी केली. रोहित शर्मा, विराट कोहली, सुर्यकुमार यादव या तीन फलंदाजांनी अर्धशतक झळकावलं. त्यामुळे कालच्या मॅचमध्ये टीम इंडियाला खूप मोठा विजय मिळला. टीम इंडियाची पुढची मॅच येत्या रविवारी होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची मॅच ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये होणार आहे. रविवारी सायंकाळी साडेचार वाजता मॅच सुरु होईल. डिजनी+हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्सवरती चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. त्यामुळे दोन्ही फॉरमॅटमधील मालिका टीम इंडियाने जिंकली. रविवारी होणाऱ्या मॅचमध्ये सुद्धा टीम इंडिया चांगली कामगिरी करेल अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.

टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्‍व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

दक्षिण आफ्रिका टीम

टेंबा बावुमा, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्सिया, मार्को जॅन्सेन, कागिसो रबाडा, रिले रोसो, तबरेझ शम्सी आणि ट्रिस्टन स्टब्स.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.