दिल्ली विरुद्ध कोलकाता… IPL मध्ये सुपरओव्हरचा थरार रंगला!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

नवी दिल्ली : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला मिळाला. श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सचा 4 धावांनी पराभव केला. या सामन्यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईकर पृथ्वी शॉची तुफानी खेळी. दिल्लीकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने 99 धावांची जबरदस्त खेळी केली. मात्र, पृथ्वीचं आयपीएलमधील पहिलं शतक केवळ एका […]

दिल्ली विरुद्ध कोलकाता... IPL मध्ये सुपरओव्हरचा थरार रंगला!
Follow us on

नवी दिल्ली : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला मिळाला. श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सचा 4 धावांनी पराभव केला.

या सामन्यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईकर पृथ्वी शॉची तुफानी खेळी. दिल्लीकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने 99 धावांची जबरदस्त खेळी केली. मात्र, पृथ्वीचं आयपीएलमधील पहिलं शतक केवळ एका धावेनं हुकलं. पृथ्वीच्या खेळीला शतकी साज न लागल्याने त्याच्या चाहत्यांनी एकच हळहळ व्यक्त केली. मात्र दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवल्याने पृथ्वीच्या खेळीला विजयी टिळा नक्कीच लागला.


सुपर ओव्हर

सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने पहिली फलंदाजी करत 20 षटकात 8 बाद 185 धावा केल्या. कोलकात्याला उत्तर देत दिल्ली कॅपिटल्स संघाने 20 षटकात 6 बाद 185 धावा केल्या. समसमान धावा झाल्याने, सुपरओव्हर खेळवण्यात आली.

सुपरओव्हर कशी झाली?

सुपरओव्हरमध्ये दिल्ली संघाने पहिली फलंदाजी केली आणि 10 धावा केल्या. यावेळी दिल्लीकडून ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर मैदानात उतरले होते. तर कोलकात्याकडून प्रसिद्ध कृष्ण गोलंदाज होता.

  1. पहिला चेंडू – ऋषभ पंतने एक धावा घेतली.
  2. दूसरा चेंडू – श्रेयस अय्यरने चौकार मारला.
  3. तीसरा चेंडू – श्रेयस अय्यर बाद
  4. चौथा चेंडू – ऋषभ पंतने दोन धावा केल्या.
  5. पांचवा चेंडू – ऋषभ पंतने दोन धावा घेतल्या.
  6. सहावा चेंडू – ऋषभने एक धाव घेतली.

कोलकाता नाईट रायडर्सची फलंदाजी : लक्ष्य 11 धावा

कोलकाटा नाईट रायडर्ससाठी आंद्रे रसेल आणि रॉबिन उथप्पा यांनी सुरुवात केली. दिल्लीतकडून कगिसो रबाडाने गोलंदाजी केली.

  1. पहिला चेंडू – आंद्रे रसेलने चौकार मारला.
  2. दुसरा चेंडू – एकही धावा नाही
  3. तिसरा चेंडू – आंद्रे रसेल बाद
  4. चौधा चेंडू – रॉबिन उथप्पाने एक धावा घेतली.
  5. पाचवा चेंडू – दिनेश कार्तिक याने एक धावा घेतली.
  6. सहावा चेंडू – रॉबिन उथप्पाने एक धावा घेतली आणि दिल्लीचा विजय झाला.

IPL च्या इतिहासातील आठवा टाय सामना

  • राजस्थान/कोलकाता, 2009
  • पंजाब/चेन्नई, 2010
  • हैदराबाद/बेंगलुरु, 2013
  • बेंगलुरु/दिल्ली, 2013
  • राजस्थान/कोलकाता, 2014
  • पंजाब/राजस्थान, 2015
  • मुंबई/गुजरात लॉयंस, 2017
  • दिल्ली/कोलकाता, 2019