Suryakumar Yadav : ‘मी येत नाहीय..तू जा!’ मुंबईत मंदिराच्या दारातच पत्नी देविशाचा सूर्यकुमार यादवला नकार, कॅमेरामन्सवर सुद्धा वैतागली, Video Viral

Suryakumar Yadav : सध्या टीम इंडियाच्या बाहेर असलेला सूर्यकुमार यादव देवदर्शन करतोय. काल करवाचौथ होतं. त्यावेळी सूर्यकुमार यादव आणि पत्नी देविशा शेट्टी एकत्र देवदर्शनासाठी निघाले होते.

Suryakumar Yadav : मी येत नाहीय..तू जा! मुंबईत मंदिराच्या दारातच पत्नी देविशाचा सूर्यकुमार यादवला नकार, कॅमेरामन्सवर सुद्धा वैतागली, Video Viral
Devisha-Suryakumar Yadav
| Updated on: Oct 30, 2026 | 8:31 AM

भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्सचा स्टार सूर्यकुमार यादव गुरुवारी करवा चौथच्या निमित्ताने बाबूलनाथ मंदिरात दर्शनासाठी गेला होता. यावेळी पत्नी देविशा शेट्टी त्याच्यासोबत होती. या जोडप्याचा क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये देविशा चालून थकल्याच दिसत आहे. मंदिराच्या पायऱ्या चढायला ती नकार देताना दिसते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर देविशा सूर्यकुमारला ‘तू जा’ असं व्हिडिओमध्ये सांगताना दिसतेय. सूर्यकुमार तिला सोबत चालण्यासाठी आग्रह करताना दिसतोय. पण ती’मी येत नाहीय..तू जा!’ असं ती सांगताना दिसते. देविशा चालण्याऐवजी तिथेच जवळ उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक कारमध्ये बसून जाताना दिसते. बाबूलनाथ हे दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध मंदिर आहे. तिथे येणाऱ्या वयोवृद्ध भाविकांसाठी इलेक्ट्रिक कारची व्यवस्था आहे.

इलेक्ट्रिक कारमध्ये बसल्यानंतर कॅमेरामन्स ते दृश्य कॅमेऱ्याच टिपण्यासाठी पाठलाग करत होते. ते पाहून सुद्धा देविशा वैतागली. हे रेकॉर्ड करु नका असं तिने सांगितलं. थकल्यामुळे आणि उपवासामुळे पोटात काही नसल्याने तिने अशी Reaction दिली असावी असा सोशल मीडियाचा सूर आहे. करवाचौथ मध्ये पत्नी पतीच्या यशसाठी, त्याला दीर्घायुष्य मिळावं म्हणून उपवास ठेवते.

Loading...

सूर्यकुमार यादवची ही कृती कौतुकाचा विषय

सूर्यकुमार यादवने सुद्धा पत्नीला यश, किर्ती, दीर्घायुष्य मिळावं यासाठी उपवास ठेवला होता. पत्नीला बरोबरीचा दर्जा, सन्मान देण्याची सूर्यकुमार यादवची ही कृती कौतुकाचा विषय ठरली आहे. मंदिरात पत्रकारांशी बोलताना सूर्यकुमार यादव गमतीने बोलला की, चंद्रोदयाला अजून चार ते पाच तास बाकी आहेत. म्हणजे उपवास सोडण्यासाठी त्याला अजून चार ते पाच तास थांबावं लागणार होतं. सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियाच्या बाहेर आहे. यावर्षी त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप जिंकला. पण त्याचा फॉर्म खराब असल्याने त्याला संघाबाहेर करण्यात आलं. टी20 संघाची धुरा श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us