Shahid Afridi: आफ्रिदी 42 वर्षांचा झाला, पण त्याचा बालिशपणा नाही गेला, वक्तव्यामुळे अडचणीत

पाकिस्तानचा माजी खेळाडू आफ्रीदीने एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

Shahid Afridi: आफ्रिदी 42 वर्षांचा झाला, पण त्याचा बालिशपणा नाही गेला, वक्तव्यामुळे अडचणीत
shahid afridi
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 04, 2022 | 12:59 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानचा (Pakistan) माजी खेळाडू शाहिद आफ्रीदी (Shahid Afridi) त्याच्या बेताल वक्तव्यामुळे अधिक प्रसिद्ध आहे. विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2022) सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर (Social Media) तो अधिक सक्रीय असतो. टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केल्यापासून आफ्रीदीने पाकिस्तान टीमच्या निवड समितीसह खेळाडूंवर टीका केली आहे. सुरुवातीच्या मॅचमध्ये पाकिस्तान टीमला चांगली खेळी करता आली नाही, त्यामुळे पाकिस्तानच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी खेळाडूंवर टीका केली आहे.

पाकिस्तानचा माजी खेळाडू आफ्रीदीने एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे तो सध्या अधिक चर्चेत आला आहे. “आयसीसी टीम इंडियाच्या बाजूने पुर्णपणे झुकलेली आहे. तसेच आयसीसीला टीम इंडिया सेमीफायनलमध्ये जावी अशी इच्छा आहे,” असं वक्तव्य केल्यापासून सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याचा खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केली आहे.

ज्यावेळी आफ्रीदीने पाकिस्तानमधील माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी “मैदान किती ओले होते ते तुम्ही पाहिले असेलच” त्यामुळे टीम इंडियाला आयसीसी पाठिंबा देत आहे. भारत-बांगलादेश सामन्यातील पंचांनातर सर्वोत्कृष्ट पंचाचा पुरस्कारही द्यायला पाहिजे असं विधान केलं आहे. बांगलादेश आणि टीम इंडियाच्या मॅचनंतर चिडलेल्या आफ्रीदीने अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

पाकिस्तानी मीडियाशी बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला, ‘मैदान किती ओले होते ते तुम्ही पाहिले असेलच. मात्र आयसीसी संघ भारताला पाठिंबा देत होता. कोणत्याही परिस्थितीत भारत उपांत्य फेरी गाठेल याची खात्री त्यांनी केली. भारत-पाकिस्तानमधील पंच हे भारत-बांगलादेश सामन्यात अ‍ॅम्पायरिंग करत होते. मी तुम्हाला सांगतो, त्याला सर्वोत्कृष्ट पंचाचा पुरस्कारही दिला जाणार आहे.