Bhuvneshwar Kumar: 2 मॅच, 8 ओव्हर अन् 99 रन्स दिले; भुवनेश्वरला कोचने स्पष्टच मेसेज दिला

Bhuvneshwar Kumar Comeback: भारत न्यूझीलंड यांच्यात टी-२० सामन्यांची मालिका सुरु असून आता तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने भुवनेश्वर कुमारबद्दल विधान केले आहे.

Bhuvneshwar Kumar: 2 मॅच, 8 ओव्हर अन् 99 रन्स दिले; भुवनेश्वरला कोचने स्पष्टच मेसेज दिला
| Updated on: Oct 26, 2026 | 12:59 PM

Morne Morkel On Bhuvneshwar Kumar: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा टी-२० सामना उद्या रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल याने एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्याने गोलंदाजांच्या कामगिरींवर भाष्य केले. आता मागील काही सामन्यात भुवनेश्वर कुमारला चांगली गोलंदाजी करता आलेली नाही. आता यावर मॉर्ने मॉर्केलने एक विधान केले आहे.

भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल भुवनेश्वरला म्हणाला की, त्याने कशाचाही पाठलाग करण्याची गरज नाही, फक्त स्वतःसारखेच खेळावे. संघात पुन्हा स्थिरावण्यासाठी भुवनेश्वरला काही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी दिली पाहिजे. त्याच्या पुनरागमनाबद्दल मला खूप सहानुभूती आहे. बघा, मी हे यासाठी म्हणतोय कारण जेव्हा तुम्ही चार वर्षांनंतर परत येता, तेव्हा अपेक्षा असणारच. त्याने आयपीएलमध्ये खूप चांगली कामगिरी केली, त्याने खूप चांगली गोलंदाजी केली. सर्वात आधी, त्याला या अपेक्षांचा दबाव स्वतःपासून दूर ठेवण्याची गरज आहे.”

Loading...

भुवीच्या निवडीपूर्वी त्याने एक महिना सराव केला, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट हा एक पूर्णपणे वेगळा खेळ आहे, जिथे चुकीला फार कमी वाव असतो. त्यामुळे, व्यस्त वेळापत्रकामुळे, त्याला खूप कमी वेळात स्वतःला तयार करून मैदानात उतरावे लागले. त्याच्याकडे कौशल्य आणि अनुभव, सर्व काही आहे. पण सरतेशेवटी, तुम्हाला क्रिकेटच्या खेळाचा आदर करावाच लागतो. त्याला काही सामन्यांमध्ये स्थिरावण्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे. तो संघात सामील झाल्यापासून माझा त्याला हाच संदेश आहे: कशाचाही पाठलाग करण्याची गरज नाही, फक्त तू जसा आहेस तसाच राहा. लोकांच्या अपेक्षा असतील, पण प्रत्येक सामन्यागणिक तुम्ही अधिक चांगले होत जा आणि तुम्हाला तुमची लय सापडेल. त्यामुळे, बाहेरील गोष्टींकडे  लक्ष देऊ नका. फक्त स्वतःसारखे रहा आणि तुमच्या खेळावर लक्ष केंद्रित करा.”

 

भारत न्यूझीलंड यांच्यात तिसरा सामना उद्या रंगणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने एक घोषणा केली आहे. बीसीसीआयने सांगितले की इशान किशनला दुखपात झाली आहे, त्यामुळे त्याला तिसराही सामना खेळता येणार नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us