Australia vs India, 3rd Test | आज पाकिस्तानला हरवल्यासारखं वाटतंय, झुंजार खेळीनंतर अश्विनची प्रतिक्रिया

| Updated on: Jan 11, 2021 | 6:03 PM

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सिडनीत खेळण्यात आलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित झाला.

Australia vs India, 3rd Test | आज पाकिस्तानला हरवल्यासारखं वाटतंय, झुंजार खेळीनंतर अश्विनची प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरा कसोटी सामना अनिर्णित
Follow us on

सिडनी : हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) या जोडीने ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटीत झुंजार भागीदारी केली. या भागीदारीमुळे ही कसोटी अनिर्णित राहिली. 5 विकेट्स गमावल्यानंतर टीम इंडिया पराभूत होते की काय, अशी भिती व्यक्त केली जात होती. मात्र अश्विन आणि विहारीने महत्वपूर्ण आणि निर्णायक भागीदारी करत सामना अनिर्णित केला. हा सामना ड्रॉ करुन पाकिस्तानचा पराभव केल्यासारखं वाटतंय, अशी प्रतिक्रिया अश्विनने दिली आहे. (team india draw 3rd sydney test against australia but the feeling of losing to pakistan  said ravichandran ashwin)

अश्विनच्या म्हणण्याचा अर्थ काय?

हा सामना ऑस्ट्रेलियविरोधात खेळण्यात आला. मग पाकिस्तानचा पराभव केल्यासारखं वाटतंय, अशी प्रतिक्रिया अश्विनने का दिली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण अश्विनने असं म्हणण्यामागेही कारण आहे. पाकिस्तान टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी आहे. दोन्ही देशांमध्ये संबध तणावाचे आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही संघात द्विपक्षी मालिका खेळण्यात आलेली नाही. त्यामुळे आता पाकिस्तान ऐवजी ऑस्ट्रेलिया टीम इंडियाचा कट्टर प्रतिस्पर्धी झाला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच आमचा कट्टर प्रतिस्पर्धी आहे. यामुळेच ऑस्ट्रेलियाविरोधातील सामना ड्रॉ केल्यानंतरही पाकिस्तानचा पराभव केल्याची भावना आहे, असं अश्विनच्या म्हणण्यामागचं उद्देश आहे.

ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिका महत्वपूर्ण

ऑस्ट्रेलियविरोधातील कसोटी मालिका टीम इंडियासाठी महत्वाची आहे. ही मालिका जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही सिडनी कसोटी ड्रॉ केली आहे. अशाप्रकारे आम्ही मालिका जिंकण्याच्या हिशोबाने आगेकूच केली आहे, असंही अश्विनने नमूद केलं.

विहारी आणि अश्विनचा संघर्ष

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी चौथ्या दिवशी 407 धावांचे तगडे आव्हान दिले होते. टीम इंडियाने चौथ्या दिवसखेर 2 विकेट्स गमावून 98 धावा केल्या. यामुळे भारताला विजयासाठी आणखी 309 धावांची आवश्यकता होती. पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला. काही ओव्हर्सनंतर कर्णधार रहाणे आऊट झाला. यानंतर रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारामध्ये 148 धावांची भागीदारी झाली. या जोडीने केलेल्या खेळीमुळे टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र पंत आणि पुजारा ही सेट फलंदाज बाद झाले.

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

यामुळे सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला. टीम इंडिया अडचणीत सापडली. भारत पराभवाच्या गर्तेत गेला. मात्र यानंतर रवीचंद्रन अश्विन आणि हनुमा विहारीने किल्ला लढवला. दोघांनी कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना केला. या दोघांना बाद करण्यासाठी कांगारुंनी अनेक प्रयत्न केले. मात्र ही जोडी शेवटपर्यंत फुटली नाही. अश्विन आणि विहारीने कांगारुंना चांगलंच रडवलं. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी पाचव्या दिवसखेर 259 चेंडूत 62 धावांची झुंजार भागीदारी केली. अश्विनने 128 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 39 धावा केल्या. तर हनुमा विहारीने 161 चेंडूमध्ये 4 फोरसह नाबाद 23 धावा केल्या.

दरम्यान या मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना 15 जानेवारीला खेळण्यात येणार आहे. हा सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind, 3rd Test | जाडेजा मैदानात न उतरल्याचा फायदा, कांगारुंचा लाजिरवाणा पराभव टळला

Australia vs India, 3rd Test, 5th Day Live : संकटमोचक हनुमा विहारीला अश्विनची साथ, तिसरी कसोटी ड्रॉ

(team india draw 3rd sydney test against australia but the feeling of losing to pakistan  said ravichandran ashwin)