Gautam Gambhir : 2027 चा वनडे वर्ल्ड कप कसा जिंकणार? आकडे बघा, गंभीर असताना टीम इंडियावर अशी वेळ यावी

Gautam Gambhir : टीम इंडिया आता आपली पुढची वनडे सीरीज जुलै महिन्यात खेळणार आहे. भारतीय टीम मॅनेजमेंटकडे आपल्या कमकुवत बाजूंवर काम करण्यासाठी वेळ आहे. जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे सीरीजपासून 2027 वनडे वर्ल्ड कपची तयारी सुरु होईल.

Gautam Gambhir : 2027 चा वनडे वर्ल्ड कप कसा जिंकणार? आकडे बघा, गंभीर असताना टीम इंडियावर अशी वेळ यावी
Gautam Gambhir
| Updated on: Jan 19, 2026 | 9:47 AM

Gautam Gambhir : टीम इंडिया 2027 मध्ये होणारा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न बघतेय. पण वनडे फॉर्मेटमध्ये भारताची स्थिती खूप चिंताजनक आहे. गौतम गंभीर हेड कोच बनल्यानंतर टीम इंडियाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक द्विपक्षीय वनडे मालिका खेळल्या आहेत. पण अपेक्षेनुसार प्रदर्शन झालं नाही. न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीज हरणं ही छोटी बाब नाही. कारण भारताला पहिल्यांदाच मायदेशात या टीम विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. याआधी सातवेळा त्यांनी भारताचा दौरा केला आहे. पण कधी वनडे सीरीज जिंकू शकले नव्हते. पण यावेळी हा दबदबा संपला.

भारत आणि न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांची वनडे सीरीज झाली. या सीरीजची सुरुवात टीम इंडियाने विजयाने केली. पण आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाचा डाव अडखळला. न्यूझीलंडने सलग दोन सामने जिंकून बाजी उलटवली. नवीन इतिहास रचला. सीरीजचा शेवटचा सामना इंदूरमध्ये खेळला गेला. तिथे विराट कोहली आणि हर्षित राणाचा अपवाद वगळता कोणलाही छाप उमटवणारी कामगिरी करता आली नाही. त्यामुळ न्यूझीलंडने 41 धावांनी सामना जिंकला.

हा टीम इंडियासाठी गंभीर संकेत

गौतम गंभीर जुलै 2024 मध्ये टीम इंडियाचे हेड कोच बनले. तेव्हापासून आतापर्यंत टीम इंडिया 5 वनडे सीरीज खेळली आहे. त्यात दोन सीरीजमध्ये विजय मिळवला. 3 सीरीजमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. 2027 च्या वनडे वर्ल्ड कप आधी हा चिंतेचा विषय आहे. टीमची रणनिती, सिलेक्शन आणि खेळाडूंचा फॉर्म यावर प्रश्नचिन्ह आहे. न्यूझीलंडची टीम या सीरीजमध्ये आपल्या मोठ्या खेळाडूंशिवाय उतरली होती. मायदेशात त्यांच्याकडून पराभव होणं हा टीम इंडियासाठी गंभीर संकेत आहे.

टीम इंडिया कोणा विरुद्ध जिंकली आणि कोणा विरुद्ध हरली?

गौतम गंभीर यांच्या कार्यकाळात टीम इंडिया आपली पहिली वनडे सीरीज श्रीलंकेविरुद्ध त्यांच्या देशात खेळली होती. त्या सीरीजमध्ये टीम इंडियाला 2-0 ने पराभवाचा सामना करावा लागला. 27 वर्षानंतर श्रीलंकेने भारताविरुद्ध वनडे सीरीजमध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध तीन मॅचच्या सीरीजमध्ये 3-0 ने क्लीन स्वीप केलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पुन्हा एकदा वनडे सीरीज गमावली. ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा 2-1 ने पराभव केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 2-1 न हरवलं. आता न्यूझीलंडकडून पराभूत झालो.