Team India : कॅच सुटल्यामुळे गोलंदाजाने केली शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल

कालच्या आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात दीपक चहरची गोलंदाजांनी चांगली धुलाई केली.

Team India : कॅच सुटल्यामुळे गोलंदाजाने केली शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल
टीम इंडिया
Image Credit source: icc
| Updated on: Oct 05, 2022 | 9:40 AM

कालच्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) पराभव झाला आहे. आशिया चषकापासून (Asia Cup 2022) टीम इंडियाच्या गोलंदाजांची कामगिरी चांगली राहिलेली नाही. शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांची कामगिरी योग्य होत नसल्यामुळे त्यांच्यावरती अधिक टीका होत आहे. कालच्या सामन्यात सुद्धा आफ्रिकेच्या (SA) फलंदाजांनी चांगली धुलाई केली. त्यावेळी एका खेळाडूच्या हातू कॅच सुटल्यानंतर गोलंदाजाने थेट शिवीगाळ केल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

कालच्या आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात दीपक चहरची गोलंदाजांनी चांगली धुलाई केली. ज्यावेळी त्याच्या गोलंदाजीवरती सरफराजने झेल सोडला. त्यावेळी रोहित शर्मा त्याच्यावरती रागावला. त्याचबरोबर दीपक चहरने रागाच्या भरात शिवीगाळ केल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

आत्तापर्यंत वादविवाद झाल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण कालच्या व्हिडीओ अधिक कमेंट आल्या आहेत, तसेच तो व्हिडीओ सुद्धा अधिक व्हायरल झाला आहे.