ठाकरे विरूद्ध शिंदे आज एकमेकांविरोधात तोफा धडाडणार; दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष

गेल्या महिनाभरपासून दसरा मेळाव्यावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं होतं. शिवसेना आणि शिंदे गटाच्या नेत्यांचे एकोमेंकाविरोधात आरोप- प्रत्यारोप सुरू होते. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या दोन्ही दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

ठाकरे विरूद्ध शिंदे आज एकमेकांविरोधात तोफा धडाडणार; दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 8:34 AM

मुंबई :  गेल्या महिनाभरपासून दसरा मेळाव्यावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं होतं. शिवसेना (Shiv sena) आणि शिंदे गटाच्या नेत्यांचे एकोमेंकाविरोधात आरोप- प्रत्यारोप सुरू होते. शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कोंडीचा प्रयत्न झाला. तर दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने देखील शिंदे गटांच्या नेत्यांवर जोरदार आरोप करण्यात आले. त्यामुळे दसरा मेळाव्याची उत्सुकता शिंगेला पोहोचली होती. अखेर तो दिवस आला आहे. आज बीकेसीवर (BKC) शिंदे गटाचा तर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचं लक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लागलं आहे.

दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

शिंदे गट आणि शिवसेनेच्या नेत्यांनी दसरा मेळावा प्रतिष्ठेचा बनवला आहे. दोन्ही गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे आपला दसरा मेळावा अधिक चांगला कसा होईल, जास्तीत जास्त गर्दी आपल्या दसरा मेळाव्याला कशी जमा होईल यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार आहे. तर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी बीकेसी मैदानात हजेरी लावत तयारीचा आढावा घेतला.

हे सुद्धा वाचा

पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा

राज्यातील तिसरा दसरा मेळावा आज भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या सध्याच्या घडामोडीवर पंकजा मुंडे काय बोलणारं हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.