Virat Kohli : मेलबर्न एअरपोर्टवर मोठा राडा, विराट कोहलीच महिलेसोबत जोरदार भांडण, VIDEO

Virat Kohli : विराट कोहली तसा तापट स्वभावाचा आहे. क्रिकेटच्या मैदानात अनेकदा ते दिसून आलय. आता मेलबर्न एअरपोर्टवर विराट कोहलीच एका महिलेसोबत वाजलय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आधीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीला विशेष कमाल दाखवता आलेली नाही. त्यात हा राडा झालाय.

Virat Kohli : मेलबर्न एअरपोर्टवर मोठा राडा, विराट कोहलीच महिलेसोबत जोरदार भांडण, VIDEO
Virat Kohli Fight with Women at melbourne airport
Image Credit source: 7 NEWS
| Updated on: Dec 19, 2024 | 2:30 PM

सध्या विराट कोहली ऑस्ट्रेलियात आहे. तिथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु आहे. गाबा टेस्ट संपल्यानंतर टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली आहे. इथे दाखल होताच विराट कोहली एका मोठ्या वादात सापडला आहे. मेलबर्नमध्ये दाखल होताच विराट कोहलीचा एका महिला पत्रकारासोबत वाद झाला आहे. एअरपोर्टवर विराट कोहली बराच वेळ महिला पत्रकारासोबत वाद घालत होता. आता प्रश्न हा आहे की, विराट कोहली अखेर या महिला पत्रकारावर इतका का भडकला?. ऑस्ट्रेलियन पत्रकाराने विराट कोहलीच्या मुलांचे फोटो काढले त्यावरुन हा दिग्गज क्रिकेटर भडकला.

विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात तो महिला पत्रकारासोबत बोलताना दिसतोय. विराट बोलताना खूप रागात दिसतोय. विराट कोहली ऑस्ट्रेलियन पत्रकारांना बोलला की, तुम्ही माझ्या परवानगीशिवाय माझ्या मुलांचे फोटो काढू शकत नाही. चॅनल 7 चा दावा आहे की, विराटच्या मुलांचे कुठलेही फोटो काढले नाहीत किंवा व्हिडिओ बनवलेला नाही. विराट कोहलीने सर्वांना सांगितलं की, प्रायव्हसी गरजेची आहे. त्याच्या परवानगीशिवाय कोणी त्याचा व्हिडिओ बनवू शकत नाही.

हे भांडण ऑस्ट्रेलियात बनलं चर्चेचा विषय

विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियन पत्रकार आणि फोटो जर्नलिस्ट सोबतचा हा वाद सगळ्या ऑस्ट्रेलियात चर्चेचा विषय बनलाय. ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये विराट कोहलीवर टीका सुरु आहे. तसे विराट आणि ऑस्ट्रेलियन मीडियाचे संबंध याआधीपासून चांगले नाहीयत. याआधीच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात सुद्धा त्याचा तिथल्या मीडियासोबत वाद झाला आहे. पण यावेळी विषय थोडा वेगळा आहे.

चौथा कसोटी सामना कधीपासून?

मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात 26 डिसेंबरपासून चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. टेस्ट सीरीज सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. पर्थ कसोटी सामना भारताने जिंकला. एडिलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. ब्रिसबेन टेस्ट मॅच ड्रॉ झाली. आता मेलबर्नमध्ये मालिकेत कोण आघाडी घेतो? त्याची उत्सुक्ता आहे.