घर नव्हे तर महल…; अलिशान घर विकून दिग्गज खेळाडू करोडपती

tennis legend ivan lendle america house sell : 10 बेडरूम, 15 बाथरूम, स्विमिंग पूल, लायब्ररी अन् बरंच काही...; दिग्गज खेळाडूचं अलिशान घर पाहिलंत का? कोट्यावधीला विकलंय घर... घराची किंमत ऐकून व्हाल थक्क... हा खेळाडू नेमका कोण आहे? त्याचं घर किती कोटींना विकलंय? वाचा सविस्तर...

घर नव्हे तर महल...; अलिशान घर विकून दिग्गज खेळाडू करोडपती
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 11:39 PM

मुंबई | 02 जानेवारी 2024 : सेलिब्रिटींची घरं ही सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असतात. त्यातच खेळाडूंची घरं तर अलिशान असतात. त्यांच्या घरात खेळाचीही व्यवस्था करण्यात येते. सध्या अशाच एका घराची सध्या जगभर चर्चा सुरु आहे. हे घर आहे, टेनिसचा दिग्गज लीजेंड इवान लेंडल याच्या घराची. कारण इवान लेंडलने नुकतंच त्याच घर विकलं आहे. 12 मिलियन डॉलर म्हणजेच 100 कोटी रुपयांना हे घर इवान लेंडलने विकलं आहे. इवान लेंडलच्या घराची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

इवान लेंडलचं अलिशान घर

इवान लेंडल याचं हे घर अमेरिकेच्या Litchfield County भागात होतं. हे घर इवान लेंडल मागच्या दोन वर्षांपासून विकण्याच्या विचारात होता. मात्र त्याची योग्य रक्कम येत नव्हती. आता मात्र इवान लेंडलचं हे घर योग्य किमतीला विकलं गेलं आहे. इवान लेंडलचं हे घर 450 एकरात पसरलेलं आहे. हे घर अमेरिकेतील Litchfield County भागातलं सर्वात मोठं घर असल्याचं सिद्ध झालं आहे. 1992 साली या घरात लेंडल आणि त्याच्या पत्नीने तयार केलं. याचं आर्किटेक्चर एलन ग्रीनबर्गने डिझाईन केलेलं आहे.

कसं आहे इवान लेंडलचं घर?

इवान लेंडलच्या या घरात 20 खोल्या आहेत. 15 बाथरूम आहेत. घरातल्या सगळ्यात मोठ्या बेडरूममध्ये दोन वॉक इन कपाटं आहेत. थोडक्यात काय तर इवान लेंडलचं हे घर प्रचंड अलिशान आहे. या घरात लायब्ररी आहे. बटलर पँन्ट्री, किचन, ट्रॉफी रूम यासोबतच अन्य सुविधा आहेत. स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, जीम या बरोबरच एक तलाव सुद्धा आहे.

इवान लेंडल कोण आहे?

इवान लेंडल याचं वय 63 वर्षे आहे. जगातल्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत इवान लेंडलचं नाव आहे. 270 आठवडे इवान लेंडल जगातला सर्वोत्तम टेनिस खेळाडू होता. त्याचा खेळ पाहणं म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असायची. इवान लेंडल याने दोन ऑस्ट्रेलियन ओपन, दोन फ्रेंच ओपन, दोन अमेरिकन ओपन आणि एकदा विंबलडन स्पर्धा इवान लेंडल याने जिंकली आहे. दिग्गज टेनिस खेळाडूंच्या यादीत इवान लेंडल याचं नाव आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.