
आत्तापर्यंत क्रिकेट खेळत असताना अनेक रेकॉर्ड झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी शहरात सद्या सुरु असलेल्या आफ्रिका क्रिकेट असोसिएशन चषक स्पर्धेत केनियाने कॅमेरूनवर 9 गडी राखून मोठा विजय मिळवला.

कालच्या सामन्यात विशेष म्हणजे हा सामना कमी कालावधीत संपला. कारण 20 चेंडूत हा सामना केनियाने जिंकला. त्यामुळे त्याची सगळीकडे चर्चा आहे.

पहिल्यांदा फलंदाजी करताना कॅमेरून टीम फक्त 48 धावा केल्या, कॅमेरूनमधील एकाही खेळाडूला अधिक धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे धावसंख्या कमी झाली होती.

केनियाच्या टीमने हा सामना निव्वल तीन ओव्हर दोन बॉलमध्ये संपवला.

केनियाकडून यश तलाटीने अवघ्या 8 धावांत 3 बळी घेतले. शाम एनगोचेनेही 10 धावांत 3 बळी घेतले. ओलोचने 2 बळी घेतले