Tokyo Olympics 2020 Live : भारतीय हॉकी संघाचा विजय, ग्रेट ब्रिटनला नमवत सेमीफायनलमध्ये मिळवली जागा

| Updated on: Aug 01, 2021 | 8:24 PM

Tokyo olympic 2020 Live Updates : कांस्यपदकासाठी खेळणाऱ्या पीव्ही सिंधूवर भारतीय चाहत्यांच्या नजरा असतील. शनिवारी तिने उपांत्य फेरीचा सामना गमावला होता.

Tokyo Olympics 2020 Live : भारतीय हॉकी संघाचा विजय, ग्रेट ब्रिटनला नमवत सेमीफायनलमध्ये मिळवली जागा
भारतीय हॉकी संघ

Tokyo Olympics 2020 Live : टोकियो ऑलिम्पिकमधील शनिवारचा दिवस भारतासाठी संमिश्र राहिला. आणखी एक भारतीय महिला हॉकी संघ आणि डिस्कस थ्रोअर कमलप्रीत कौरच्या विजयाने भारतीयांना आनंद दिला. तर दुसरीकडे जागतिक क्रमवारीतील बॉक्सर अमित पंघाल आणि स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूच्या पराभवामुळे चाहत्यांच्या सुवर्ण पदकाच्या आशा मावळल्या. आज भारत जास्त सामने खेळणार नाहीय. गोल्फ आणि घोडेस्वारी व्यतिरिक्त, पीव्ही सिंधू कांस्य पदकाच्या सामन्यासाठी चीनच्या हीशी भिडणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 01 Aug 2021 07:06 PM (IST)

  भारतीय हॉकी संघाचा विजय

  भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ओलिम्पिकमध्ये क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटेनला 3-1 ने नमवत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला. भारताकडून दिलप्रीत, गुरजंत आणि हार्दिक यांनी गोल केला. 40 वर्षानंतर भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला असून बेल्जियम संघासोबत भारताचा सामना असेल.

 • 01 Aug 2021 06:28 PM (IST)

  पंतप्रधान मोदींनी दिल्या सिंधूला शुभेच्छा

 • 01 Aug 2021 06:01 PM (IST)

  बॅडमिंटन : पीव्ही सिंधूने जिंकला सामना

  सिंधूने 13-21 आणि 15-21 अशा दोन सरळ सेट्समध्ये विजय मिळवत सामना जिंकला आहे. या विजयासोबतच सिंधूला कांस्य पदकही मिळाले आहे.

 • 01 Aug 2021 05:59 PM (IST)

  हॉकी - भारतीय संघाची आघाडी

 • 01 Aug 2021 05:36 PM (IST)

  हॉकी : भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटेन सामना सुरु

  भारत आणि ग्रेट ब्रिटेन या दोन्ही संघात क्वॉर्टर फायनलचा सामना सुरु झाला आहे.पराभूत होणाऱ्या संघाची ऑलिम्पिक वारी आज याठिकाणी संपेल.

 • 01 Aug 2021 05:31 PM (IST)

  बॅडमिंटन : पहिला गेम सिंधूच्या नावावर

  सिंधूने शानदार खेळ दाखवत 21- 13 च्या फरकाने पहिला सेट जिंकला आहे. ब्रेकमध्ये सिंधूने 11-8 ची आघाडी घेतली होती. त्यानंतर शेवटपर्यंत अप्रतिम कामगिरी करत सेट जिंकला.

 • 01 Aug 2021 05:24 PM (IST)

  बॅडमिंटन : पहिल्या सेटच्या ब्रेक दरम्यान सिंधू आघाडीवर

  पहिल्या सेटमध्ये ब्रेक झाला असताना सिंधूने आघाडी घेतली आहे. सिंधूने 14-9 ची आघाडी घेतली आहे.

 • 01 Aug 2021 05:09 PM (IST)

  बॅडमिंटन -पीव्ही सिंधू विरुद्ध ही यांच्यातील सामन्याला सुरुवात

  सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर सिंधू किमान कांस्य पदक जिंकण्यासाठी मैदानात उतरली आहे. चीनच्या ही बिंगजियाओसोबत सिंधूच्या सामन्याला सुरुवात झाली आहे.

 • 01 Aug 2021 04:48 PM (IST)

  बॅडमिंटन -पीव्ही सिंधूचा सामना थोड्यात वेळात होणार सुरु

  सिंधू आणि चीनची खेळाडू ही बिंगजियाओ यांच्यात कांस्य पदकासाठीच्या सामन्यासाठी काही वेळात सामना सुरु होणार आहे. दोघी आतापर्यंत 15 वेळा आमने-सामने भिडल्या असून सिंधू केवळ 6 सामने जिंकली असून ही 9 सामने जिंकली आहे.

 • 01 Aug 2021 04:28 PM (IST)

  गोल्फ – अनिर्बान लाहिड़ी 42 व्या स्थानावर

  आज पुरुष गोल्फचा शेवटचा राउंड पाडला. यात भारताचे दोन खेळाडू सहभागी होते. अनिर्बान लाहिड़ी एकूण 279 गुण मिळवून 42 व्या स्थानावर होते. त्याने चार राउंडमध्ये 67, 72, 68, 72 असे गुण मिळवले. तर उद्ययन माने याने चार राउंडमध्ये 76, 69, 70, 72 गुण मिळवत एकूण 287 गुण मिळवले. तो 56 व्या स्थानावर होता.

 • 01 Aug 2021 03:50 PM (IST)

  टेनिस – युवा स्टार ज्वेरेवने जिंकल सुवर्ण पदक

  एलेक्सजेंडर ज्वेरेवने रशिया ओलिम्पिक कमिटीच्या केरन खाचानोवला नमवत सुवर्ण पदक जिंकलं. 1988 नंतर स्टेफी ग्राफनंतर जर्मनीसाठी सुवर्णपदक मिळवणारा ज्वेरेव पहिला आहे.

 • 01 Aug 2021 11:39 AM (IST)

  हॉकी – भारतीय पुरुष संघाला पदक जिंकण्याची संधी

  भारतीय पुरुष हॉकी संघ आज ग्रेट ब्रिटेन संघाविरुद्ध क्वॉर्टर फायनलच्या सामन्यात उतरणार आहे. भारतीय हॉकी संघाने 1980 नंतर अद्यापर्यंत ऑलिम्पिक पदक जिंकलेलं नाही. पण भारताला यंदा ही संधी आहे.

 • 01 Aug 2021 10:10 AM (IST)

  सतीश कुमार उपांत्यपूर्व सामना 0: 5 ने हरला

  सतीश कुमार तीनही राउंड हरला आहे. सतीश कुमार शेवटचा राऊंड 0: 5 ने हरला. पदकाच्या शर्यतीतून तो आता बाहेर पडला आहे. सतीश कुमार सगळ्या मॅचमध्ये कधीही विजयाच्या स्थितीत दिसला नाही. टॉपसीडसमोर जखमी सतीशने हार मानली नाही आणि प्रयत्न करत राहिला पण अखेर त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं.

 • 01 Aug 2021 09:38 AM (IST)

  बॉक्सिंग - सतीश कुमार समोर विश्वविजेत्याचं आव्हान

  आज उपांत्यपूर्व फेरीत, सतीशचा सामना उझबेकिस्तानच्या बखोदिर जलोलोवशी होणार आहे. जलोलोव्हने अझरबैजानच्या मोहम्मद अब्दुल्लायेवचा 5-0 असा पराभव केला होता.

 • 01 Aug 2021 09:12 AM (IST)

  बॉक्सर सतीश कुमार भारताला पदक मिळवून देणार का?

  ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा भारताचा पहिला सुपर हेवीवेट (91 किलो प्लस) बॉक्सर सतीश कुमारने पहिल्या सामन्यात जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दोन्ही बॉक्सर्ससाठी हे पहिले ऑलिम्पिक आहे.

 • 01 Aug 2021 08:20 AM (IST)

  पुणे शहरातील निर्बंध जैसे थे ठेवल्याने व्यापारी आंदोलनाच्या तयारीत

  पुणे

  पुणे शहरातील निर्बंध जैसे थे ठेवल्याने व्यापारी आंदोलनाच्या तयारीत

  शहरातील दुकानांची वेळ वाढवून देण्याबरोबरच विकेंड लॉकडाऊन मध्ये शिथीतला देण्याची व्यापाऱ्यांची मागणी

  मात्र, शहर आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट कमी होत नसल्याने प्रशासनाने ठेवले निर्बंध कायम

 • 01 Aug 2021 07:54 AM (IST)

  भारताचे महत्त्वाचे सामने

  बॉक्सिंग - पुरुष +91 किलो उपांत्यपूर्व फेरी: सतीश कुमार वि. जलोलोव - सकाळी 9:36 वाजता

  बॅडमिंटन - महिला एकेरी कांस्य पदक - पीव्ही सिंधू विरुद्ध ही बिंग जिओ - संध्याकाळी 5:00 वाजता

 • 01 Aug 2021 07:54 AM (IST)

  भारत आज 5 खेळ खेळणार

  रविवारी, टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या नवव्या दिवशी, भारतातील खेळाडू पाच वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होताना दिसतील. यापैकी दोन खेळांमध्ये भारताला पदके मिळू शकतात.

 • 01 Aug 2021 07:52 AM (IST)

  भारताला आज PV सिंधूकडून पदकाची अपेक्षा

  पदकाच्या इनुषंगाने भारतासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज भारताची पीव्ही सिंधू कांस्य पदकाचा सामना खेळणार आहे. तिच्याकडून भारतवासियांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Published On - Aug 01,2021 7:47 AM

Follow us
या कंपन्यांना होणार फायदा,रजनीश कुमार बँकिंग सिस्टीमविषयी काय म्हणाले?
या कंपन्यांना होणार फायदा,रजनीश कुमार बँकिंग सिस्टीमविषयी काय म्हणाले?.
अख्ख्या समाजाची छी थू झालीय, का घाबरताय...,' काय म्हणाले अजय महाराज
अख्ख्या समाजाची छी थू झालीय, का घाबरताय...,' काय म्हणाले अजय महाराज.
देशात AI किती मोठे चॅलेंज?आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे नोकऱ्या धोक्यात?
देशात AI किती मोठे चॅलेंज?आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे नोकऱ्या धोक्यात?.
मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री आपल्याच सरकारवर भडकल्या? बघा कसं झापलं?
मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री आपल्याच सरकारवर भडकल्या? बघा कसं झापलं?.
'मनोज जरांगे हे बालबुद्धी, त्यांची अवस्था एक दिवस...,' - आशीष देशमुख
'मनोज जरांगे हे बालबुद्धी, त्यांची अवस्था एक दिवस...,' - आशीष देशमुख.
WITT : Not An ERA Of War विषयावर सखोल चर्चा, भारताची भूमिका काय?
WITT : Not An ERA Of War विषयावर सखोल चर्चा, भारताची भूमिका काय?.
... म्हणून चीनवर भडकले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट
... म्हणून चीनवर भडकले ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी ॲबॉट.
भारत हा आशियातील महासत्ता अन् महान देश, टोनी ॲबॉट भारतावर भरभरून बोलले
भारत हा आशियातील महासत्ता अन् महान देश, टोनी ॲबॉट भारतावर भरभरून बोलले.
WITT : मोदी हे सामान्य नेते नाहीत तर..टोनी ॲबॉट यांच्याकडून गौरवोद्गार
WITT : मोदी हे सामान्य नेते नाहीत तर..टोनी ॲबॉट यांच्याकडून गौरवोद्गार.
WITT : भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर... - बरुण दास
WITT : भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर... - बरुण दास.