Olympics 2024 Highlights And Update: टीम इंडियासाठी पहिला दिवस संमिश्र, अशी राहिली कामगिरी
Paris Olympics 2024 27 July Updates Highlights In Marathi : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी (27 जुलै) भारताच्या खेळाडूंनी एकूण 7 प्रकारात सहभाग घेतला. बॅडमिंटन, नेमबाजी, हॉकीमध्ये टीम इंडियाने उल्लेखनीय कामगिरी केली.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेची दणक्यात सुरुवात झाली. शुक्रवारी पॅरीसच्या सीन नदीवर ओपनिंग सेरेमनी पार पडली. या 206 देशांचे 6 हजार 500 पेक्षा अधिक खेळाडू 94 बोटींमधून उद्घाटन समारंभात सहभागी झालेत. पीव्ही सिंधू आणि शरतने भारताच्या चमूचं नेतृत्व केलं. उद्घाटन समारंभाची औपचारिकता पार पडल्यानंतर पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विजयी सुरुवात करुन मेडलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलंय. तर काही खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. हॉकी टीम इंडियाने न्यूझीलंडवर 3-2 अशा फरकाने मात करत विजयी सलामी दिली. अशाप्रकारे टीम इंडियासाठी पहिला दिवस हा संमिश्र असा ठरला.
LIVE NEWS & UPDATES
-
टीम इंडियाची पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिल्या दिवसाची कामगिरी
हॉकी टीम इंडियाने ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच विजयी सुरुवात केली. टीम इंडियाने न्यूझीलंडला 3-2 ने पराभूत केलं. तर महिला नेमबाज मनू भाकेर फायनलसाठी पात्र ठरली. बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन यानेही विजयी सुरुवात केली. सात्विक आणि चिराग या बॅडमिंटनपटू जोडीने विजयी सलामी दिली. तर हरमीत देसाई यानेही विजयाने मोहिमेची सुरुवात केली.
संदीप/एलावेनिल आणि अर्जुन/रमिता 10 मी एअर रायफलमध्ये (नेमबाजी) फायनलसाठी पात्र ठरु शकले नाहीत. सरबजोत आणि चीमा यांनाही फायनलसाठी पात्र होण्यात अपयश आलं. 10 मी एअर पिस्तूल नेमबाजीत रिदमचा प्रवास इथेच संपला. तर बलराज पंवर (नौकानयन) उपांत्य फेरी गाठू शकला नाही. अशा प्रकारे भारतासाठी पहिला दिवसा हा संमिश्र स्वरुपाचा ठरला.
-
हॉकी टीम इंडियाचा विजय, न्यूझीलंडवर मात
हॉकी टीम इंडियाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विजयाने सुरुवात केली आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात न्यूझीलंडवर 3-2 अशा फरकाने मात करत शानदार सुरुवात केली आहे.
-
-
लक्ष्य सेनने जिंकला पहिला सामना
पॅरिस ऑलिम्पिकमधील पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनने विजयी सलामी दिली आहे. लक्ष्यने एल गटातील पहिला सामना सलग 2 सेटमध्ये जिंकून शानदार सुरुवात केली आहे. त्याने ग्वाटेमालाचा खेळाडू केविन कॉर्डनचा धुव्वा उडवला आहे. सेनने 21-8 आणि 22-20 अशा फरकाने दोन्ही सेट जिंकले. लक्ष्यचा आता पुढील गट लढतीत बेल्जियमचा खेळाडू ज्युलियन कारागीशी सामना होणार आहे.
लक्ष्यची विजयी सुरुवात
🚨 Badminton – @lakshya_sen gets his first win in his first match 👏🏽 A comfortable 2 set win. pic.twitter.com/OdjwuivPIK
— Team India (@WeAreTeamIndia) July 27, 2024
-
लक्ष्य सेनने जिंकला पहिला गेम
बॅडमिंटन पुरुष सिंगल स्पर्धेत लक्ष्य सेनने कॉर्डन केविनविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आघाडी घेतली आहे. पहिला सेट त्याने 21-8 ने जिंकला. तसेच 1-0 पुढे आहे.
-
बलराज रविवारी रोईंगच्या रिपेचेज स्पर्धेत सहभागी होणार
पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी बलराज पनवारने पुरुष एकेरी स्कल्स हिट्स फेरीत रोईंगमध्ये चौथे स्थान मिळविले. आता तो रविवारी 27 जुलै रोजी दुपारी 1:05 वाजता रिपेचेज स्पर्धेत भाग घेईल आणि उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा प्रयत्न करेल.
-
-
मनु भाकरला 6 सीरिजमध्ये एकूण 580 अंक
भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमधून आनंदाची बातमी समोर आली आहे. मनु भाकर हीने 10 मीटर एअर पिस्तूल या प्रकारात फायनलसाठी क्वालिफाय केलं आहे. मनुने 6 सीरिजमध्ये एकूण 580 अंक मिळवले. मनुने तिसरं स्थान पटकावलं आहे.
-
मनु भाकर पहिल्या सीरिजमध्ये 97 अंकासह चौथ्या स्थानी
10 मीटर एयर पिस्टल नेमबाजीत मनु भाकर हीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मनु भाकर या प्रकारातील एकूण 6 पैकी पहिल्या सीरिजमध्ये 97 अंकासह चौथ्या स्थानी आहे. तर रिदम सांगवान 97 गुणांसह सातव्या क्रमांकावर विराजमान आहे. या प्रकारात एकूण 6 सीरिज होणार आहेत. त्यानंतर अव्वल 8 खेळाडू हे अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
-
चीनची दणक्यात सुरुवात, पहिल्याच दिवशी 2 गोल्ड मेडल
चीनने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली आहे. चीनने दुसरं सुवर्ण पदकही जिंकलं आहे. चँग यानी आणि चेन यिवेन यांनी डायविंग वूमन्स स्पर्धेतील सिंक्रोनाइज्ड 3 मीटर स्प्रिंगबोर्ड या प्रकारात ही सुवर्ण कामगिरी केली आहे.
-
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील पहिल्या दिवसाचं भारताचं वेळापत्रक
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मोठ्या जल्लोषात पार पडल्यानंतर पहिल्याच दिवशी भारताचे कोणत्या खेळातील सामने किती वाजता सुरु होतील? याची उत्सुकता आहेत. जाणून घ्या भारताचं पहिल्या दिवसाचं वेळापत्रक
भारताचं पहिल्या दिवसाचं वेळापत्रक
🚨 Here’s the schedule for Day 1 (27th July) of the @paris2024 Olympic Games! Tune in to cheer loud and proud for our athletes.
Chalo #JeetKiAur #Cheer4Bharat | #IndiaAtParis24 pic.twitter.com/lI2CJhSA1J
— Team India (@WeAreTeamIndia) July 26, 2024
-
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धा ऐतिहासिक, नक्की काय झालं?
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत इतिहास रचला गेला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरुष आणि महिला खेळाडूंची संख्या ही समसमान आहे. यातून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला गेला आहे.
-
भारतीय खेळाडूंची बोटीतून शानदार एन्ट्री, सिंधूने फडकावला तिरंगा
सीन्स नदीत अखेर अनेक मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय चमूचं बोटीतून आगमन झालं. या बोटीत पथसंचलनात एकूण 16 पैकी 12 खेळांमधील 78 खेळाडू आणि अधिकाऱ्यांचा समावेश होता. तसेच पीव्ही सिंधूने भारताचा ध्वज फडकावला. तसेच उपस्थितांचे आभार मानले.
-
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक खेळाडू अमेरिकेचे
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक खेळाडू हे अमेरिकेचे आहेत. या ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 206 देशातील 10 हजार 714 खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत अमेरिकेचे सर्वाधिक 592 खेळाडू आहेत.
-
ग्रीसच्या चमूची सर्वातआधी एन्ट्री, कारण काय?
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात धडाक्यात सुरुवात झाली आहे. या उद्घाटन समारंभात ग्रीसच्या खेळाडूंची बोट सीन नदीत सर्वात आधी आली. सर्वात पहिली ऑलिम्पिक स्पर्धा ही येथेच (अथेन्स) खेळवण्यात आली होती. त्यामुळेच पॅरिस ऑलिम्पिकमध्येही ग्रीसला पहिला मान देण्यात आला आहे.
-
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाची सुरुवात झाली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदच ओपनिंग सेरेमनी स्टेडियमच्या बाहेर नदीत होत आहे.
-
पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय चमूचं वैशिष्टय
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताकडून 70 पुरुष आणि 47 महिला असे एकूण 117 खेळाडू 16 विविध खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. रोहन बोपन्ना हा भारतीय चमूतील सर्वात वयस्कर (44 वर्ष) खेळाडू आहे. तर धिनीधी देसिंघू ही सर्वात युवा (14 वर्ष) खेळाडू आहे. शरथ कमल याचा ही पाचवी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. तर रोहन बोपन्ना, पी व्ही सिंधू, मानिका बत्रा आणि मीराबाई चानू यांची ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय चमूचं वैशिष्टय
Time to list the 117 Indian athletes who will be participating at Paris Olympics!
Key Highlights: ➡️ 70 men + 47 women across 16 sports ➡️ 72 athletes making their Olympic debut ➡️ Oldest athlete: Rohan Bopanna (44 yrs) ➡️ Youngest athlete: Dhinidhi Desinghu (14 yrs) ➡️… pic.twitter.com/flhGjk7haj
— India_AllSports (@India_AllSports) July 26, 2024
-
117 खेळाडू आणि 16 खेळ, भारताचा पथसंचलनात कितवा नंबर?
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 32 खेळांसाठी 329 सुवर्ण पदक असणार आहेत. यासाठी 206 एसोसिएशन आणि विविध देशांचे 10 हजार 500 खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे एकूण 117 खेळाडू हे 16 विविध खेळांमध्ये सहभागी असणार आहेत. उद्घाटन समारंभात भारतीय पथकाचा पथसंचलनात 80 वा नंबर असणार आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना नाईलाजाने आधीच्या 79 देशांचं पथसंचलन पाहावं लागणार आहे. पथसंचलनात भाषेच्या निकषावरुन स्थान निश्चिती होते. पी व्ही सिंधूच्या हाती या समारंभात भारताचा तिरंगा असणार आहे. तसेच्या सिंधूसह टेबल टेनिसपटू शरत कमलही असणार आहे. भारताच्या पथसंचलनात एकूण 16 पैकी 12 खेळांमधील 78 खेळाडू आणि अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. तर ग्रीसचं चमू या उद्घाटन समारंभात सर्वात आधी पथसंचलन करणार आहे.
-
उद्घाटन समारंभात काय काय होणार?
उद्घाटन समारंभाला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजेपासून सुरुवात होणार आहे. या दरम्यान पॅरिसचा इतिहास, कला संस्कृती याबाबतची माहिती दिली जाऊ शकते. सीन नदीवर 6 किमी मिरवणूकीचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच शेवटी ऑलिम्पिक मशाल पेटवून खेळाची अधिकृतरित्या घोषणा केली जाणार आहे.
-
Paris Olympics 2024 LIVE Updates: पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन समारंभ
ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन समारंभाचं आयोजन हे स्टेडियमबाहेर होणार आहे. उद्घाटन समारंभात स्पर्धेतील 10 हजार 500 खेळाडूंची 100 बोटीतून सीन्स नदीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक 6 किमीपर्यंत असणार आहेत.
Published On - Jul 26,2024 9:05 PM
