Tokyo Olympics 2021 Live : पैलवान रवी दहियाला रौप्यपदक, दीपक पुनियाची कांस्यपदकाची झुंज अयशस्वी

Tokyo olympic 2021 Live updates : कुस्तीच्या दृष्टीने आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. गुरुवारी अनेक देशांचे अनेक खेळाडू मेल मॅचमध्ये जीवाची बाजी लावून खेळतील.

Tokyo Olympics 2021 Live : पैलवान रवी दहियाला रौप्यपदक, दीपक पुनियाची कांस्यपदकाची झुंज अयशस्वी
कुस्तीपटू रवि दहिया

Tokyo Olympics 2021 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा गुरुवारचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कांस्यपदकाच्या लढतीl भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीला नमवत कांस्य पदक मिळवलं. देशाच्या अनेक खेळाडूंनी आज पदके जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावली ज्यात दीपक पुनिया थोडक्यात कांस्य पदकापासून हुकला.तर पैलवान विनेश फोगट ऑलिम्पिकच्या क्वॉर्टर फायनलमध्ये पराभूत झाली. याशिवाय रवि दहियाने रौप्य पदक पटकावलं

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 05 Aug 2021 17:02 PM (IST)

  दीपक पुनियाची कांस्य पदकाची संधी हुकली

  कांस्य पदकासाठी दीपक पुनियाची लढत सुरु असून पहिल्या राऊंडमध्ये नाझीम माईल्स वर पुनियानं आघाडी घेतली होती. मात्र, अखेर नाझीम माईल्सनं पुनरागमन केलं आणि त्यानं कांस्य पदक मिळवलं

 • 05 Aug 2021 16:56 PM (IST)

  कांस्य पदकासाठी दीपक पुनियाची लढत सुरु, पहिल्या राऊंडमध्ये पुनिया आघाडीवर

  कांस्य पदकासाठी दीपक पुनियाची लढत सुरु आहे. पहिल्या राऊंडमध्ये पुनिया आघाडीवर आहे. 2-1  अशी आघाडी दीपक पुनियानं मिळवली आहे.

 • 05 Aug 2021 16:52 PM (IST)

  दीपक पुनियाची कांस्य पदकासाठी लढत सुरु

  भारताचा कुस्तीपटू दीपक पुनियाची कांस्य पदकासाठी लढत सुरु झाली आहे.

 • 05 Aug 2021 16:45 PM (IST)

  किरेन रिजीजू यांनी केले रवी दहियाचे अभिनंदन   

  रवी दहियाच्या खिशात रौप्य पदक

  रवी दहियाचा 7-4 च्या फरकाने थोडक्यात पराभव

  केंद्रीय न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी केले रवी दहियाचे अभिनंदन

 • 05 Aug 2021 16:42 PM (IST)

  रेसलिंग – रवी दहियाचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं

  अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी 7-4 च्या फरकाने पराभूत झाला. प्रतिस्पर्धी जावूर युगुयेवने अप्रतिम कमागिरी करत सुवर्णपदक जिंकलं. तर रवीच्या पदरात रौप्यपदक पडलं आहे.

 • 05 Aug 2021 16:11 PM (IST)

  रेसलिंग – रवी दहियाचा अंतिम सामना काही वेळातच

  भारताला आज टोक्यो ऑलिम्पकमध्ये पहिले सुवर्णपदक मिळण्याची दाट शक्यता आहे. भारताचा कुस्तीपटू  रवी दहिया  57 किलोग्राम वजनी गटात अंतिम सामना खेळणार आहे. त्याच्या समोर रशिया ओलिम्पिक समितिचा (आरओसी) के जावुर युवुगेव असणार आहे. काही वेळातच या सामन्याला सुरुवात होणार आहे. रवीने सामना जिंकल्यास एकेरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय बनेल. याआधी निशानेबाज अभिनव बिंद्राने केवळ अशाप्रकारे सुवर्णपदक मिळवलं आहे.

 • 05 Aug 2021 16:08 PM (IST)

  एथेलेटिक्स – 20 किमी रेस वॉक समाप्त

  इटलीच्या मासिमो स्टेनो याने 20 किमी पुरुषांच्या रेस वॉकमध्ये सुवर्णपदक पटकावलं. भारताचा कोणताच खेळाडू खास कामगिरी करु शकला नाही. राहुल 47 व्या, केटी इरफान 51 व्या आणि संदीप कुमार 53 व्या स्थानावर राहिले.

 • 05 Aug 2021 14:10 PM (IST)

  एथलेटिक्स (20 किमी वॉक) – 10 किमी नंतर 12 व्या स्थानावर संदीप

  20 किमी रेस वॉकचं अर्ध अंतर पार झालं असून 10 किमीनंतर कोणीही भारतीय खेळाडू टॉप 10 मध्येही नाही. 8 किमीपर्यंत दुसऱ्या स्थानावर असणारा संदीप कुमार 10 किमीनंतर 12 व्या स्थानावर पोहचला आहे.

 • 05 Aug 2021 13:59 PM (IST)

  गोल्फ : अदिती अशोकचे शानदार प्रदर्शन

  भारताची स्टार महिला गोल्फर अदिती अशोकने ऑलिम्पिकमध्ये आपलं शानदार प्रदर्शन सुरु ठेवलं असून दुसऱ्या राउंडमध्येही उत्तम कामगिरी केली आहे. पहिल्या राउंडमध्ये 69 गुण मिळवल्यावर दुसऱ्या राउंडमध्ये तिने 64 गुण मिळवत एकूण 133 गुण खात्यात घेतले आहेत. ती संयुक्त रूपात दुसऱ्या स्थानावर आहे.

   

 • 05 Aug 2021 13:48 PM (IST)

  एथलेटिक्स (20 किमी रेस वॉक) – 8 किमीनंतर संदीप कुमार दुसऱ्या स्थानावर

  चार किमी रेसनंतर दुसऱ्या स्थानावर असलेला भारताचा संदीप कुमार  8 किमी नंतरही दुसऱ्याच स्थानावर आहे. त्याच्यापुढे चीनचा के केईहुआ वँग आहे.

 • 05 Aug 2021 13:43 PM (IST)

  एथलेटिक्स (20 किमी रेस वॉक) – भारताटे तीन खेळाडू घेत आहेत सहभाग

  एथलेटिक्स खेळांमध्ये 20 किमी रेस वॉकला सुरुवात झाली आहे. यामध्ये भारताचे तीन खेळाडू सहभाग घेत आहेत. केटी इरफान, संदीप कुमार आणि राहुल अशी त्यांची नावे आहेत.

 • 05 Aug 2021 13:17 PM (IST)

  नरेंद्र मोदींनी भारतीय संघाशी फोनवरुन केली चर्चा

 • 05 Aug 2021 13:04 PM (IST)

  सकाळ पासूनचा लेखा जोखा थोडक्यात

  कुस्तीपटू अंशू मलिक रेपेचेज सामन्यात पराभूत

  कुस्तीपटू विनेश फोगाट क्वॉर्टर फायनलमध्ये पराभूत

  भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीला नमवत कोरलं कांस्य पदकावर नाव

 • 05 Aug 2021 12:38 PM (IST)

  अभिनव बिंद्राने भारतीय संघाला लिहिलं भावूक पत्र

 • 05 Aug 2021 12:00 PM (IST)

  भारताचे आजचे उर्वरीत सामने

  दुपारी 1 वाजता – एथलेटिक्स – केटी इरफान, संदीप कुमार आणि राहुल रोहिल्ला (20 किमी रेसवॉक)

  दुपारी 4 वाजून 20 मिनिटे – रवि दहिया (57 किलो वजनी गट अंतिम सामना)

  दुपारी 4 वाजून 45 मिनिटे – दीपक पूनिया (कांस्य पदकासाठी सामना)

 • 05 Aug 2021 11:29 AM (IST)

  गोल्फ – दीक्षा डागरचे दोन राउंड पूर्ण

  भारताची महिला गोल्फपटू दीक्षा डागरने दुसरा राउंडही पूर्ण केला आहे. ती सध्या 54 व्या स्थानावर आहे. तिने 76 आणि 72 गुण पहिल्या आणि दुसऱ्या राउंडमध्ये मिळवले आहेत.

 • 05 Aug 2021 09:45 AM (IST)

  विनेशचा पराभव पण अजूनही कांस्य पदक जिंकू शकते!

  कुस्तीमध्ये मोठा उलटफेर झालेला पाहायला मिळाला. जगातील नंबर वन कुस्तीपटू विनेश फोगटला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरं जावं लागंल आहे. असं असतानाही विनेशला पदक जिंकण्याची संधी आहे, पण त्यासाठी Vanes या खेळाडूला अंतिम फेरी गाठावी लागेल. विनेश रिपेचेज फेरीत कांस्यपदक जिंकू शकते.

 • 05 Aug 2021 09:43 AM (IST)

  कुस्ती – क्वार्टरफायनलमध्ये विनेश फोगाटचा पराभव

  भारताची स्टार कुस्तीपटू आणि गोल्ड मेडलची प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या विनेश फोगट हिला उपांत्यपूर्व लढत गमवावी लागली आहे. तिला बेलारूसच्या व्हेनेसाने पराभूत केलं. विनेशला आता रेपेचेज मॅचसाठी व्हेनेसा फायनलमध्ये पोहोचावी, अशी प्रार्थना करावी लागणार आहे.

 • 05 Aug 2021 09:27 AM (IST)

  पंतप्रधान मोदींकडून भारतीय हॉकी खेळाडूंचं अभिनंदन

 • 05 Aug 2021 09:05 AM (IST)

  भारताने इतिहास रचला!

 • 05 Aug 2021 09:01 AM (IST)

  आणि भारताने पदक जिंकलं…!

 • 05 Aug 2021 08:54 AM (IST)

  भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय, 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपला

  भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला आहे.  जर्मनीला 5-4 ने हरवत भारताने कांस्य पदक मिळवलेलं आहे. भारतीय संघाच्या विजयाने तब्बल 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपला आहे. भारताने हॉकीमधील शेवटचं पदक 1980 साली जिंकलं होतं…

 • 05 Aug 2021 08:50 AM (IST)

  जर्मनीकडून चौथा गोल, भारत 5-4 ने आघाडीवर

  चौथ्या क्वार्टरची जर्मनीने शानदार सुरुवात केली आहे. 48 व्या मिनिटाला जर्मनीने चौथा गोल केला. या गोलमुळे भारताची आघाडी कमी झाली आहे. जर्मनीने पेनल्टी कॉर्नरद्वारे हा गोल केला. चौथ्या क्वार्टरच्या या गेममध्ये जर्मनीचे वर्चस्व राहिले आहे. टीम इंडिया सध्या आघाडीवर आहे. भारत 5-4 ने आघाडीवर आहे.

 • 05 Aug 2021 08:22 AM (IST)

  हॉकी (पुरुष) – पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठविण्यात भारत अपयशी

  42 व्या मिनिटाला रुपिंदरचा शॉट जर्मन खेळाडूच्या पायाला लागला आणि भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण भारतीय संघ त्याचं गोलमध्ये रुपांतर करू शकला नाही. भारताला सलग दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि यावेळीही भारताला यश मिळाले नाही.

 • 05 Aug 2021 08:11 AM (IST)

  भारत 5-3 ने आघाडीवर

  टीम इंडियाचं हॉकीमध्ये जर्मनीवर वर्चस्व असलेलं पाहायला मिळतंय. भारताने 5-3 अशी आघाडी घेतली आहे. भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले आहेत. भारताने 31 व्या मिनिटाला चौथा गोल केला. रुपिंदर पाल सिंगने पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रुपांतर केले. यानंतर सिमरनजीत सिंगने 34 व्या मिनिटाला गोल केला. या गोलसह भारताने जर्मनीवर 2 गोलची आघाडी घेतली आहे.

 • 05 Aug 2021 08:06 AM (IST)

  विनेश फोगाटची विजयाने सुरुवात, क्वार्टर फायनलमध्ये धडक

  विनेश फोगाटने टोकियो ऑलिम्पिक प्रवासाची विजयाने सुरुवात केली आहे. स्वीडनच्या सोफियाला 7-1 ने विनेशने पराभूत केलं आहे. या विजयाबरोबर विनेश क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली आहे.

 • 05 Aug 2021 08:02 AM (IST)

  हॉकी (पुरुष) – पूर्वार्धापर्यंत दोन्ही संघ 3-3 ने बरोबरीत

  पहिला पूर्वार्ध संपला आहे. दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीकडून सलग दोन गोल केल्यानंतरही भारतीय संघ दबावाखाली आला नाही आणि दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केल्यामुळे भारताने 3-3 अशी बरोबरी साधली. भारतीय हॉकीसाठी पुढील 30 मिनिटे अत्यंत महत्त्वाची आहेत

 • 05 Aug 2021 07:59 AM (IST)

  हॉकी (पुरुष) – भारताकडून 2 पेनल्टी कॉर्नरला 2गोल

  26 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, हरमनप्रीत सिंगचा ड्रॅग-फ्लिक जर्मन गोलरक्षकाने रोखलं पण हार्दिक सिंगने पुन्हा रिबाउंडवर गोल केला. यानंतर, संघाला 28 व्या मिनिटाला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि यावेळी हरमनप्रीत सिंगच्या ड्रॅग फ्लिकने भारताला 3-3 ची बरोबरी करुन दिली.

 • 05 Aug 2021 07:49 AM (IST)

  हॉकी (पुरुष) – सिमरनजीतकडून भारतासाठी पहिला गोल

  भारताने दूसरे क्वार्टरच्या शुरुवातीलाच गोल केला. सिमरनजीतला सर्कलच्या आतच बॉल मिळाला. त्याने बॉलला टर्न करत गोल केला आणि भारतीय संघाला जर्मनीशी बरोबरी करुन दिली.

   

   

 • 05 Aug 2021 07:30 AM (IST)

  हॉकी (पुरुष) – जर्मनीला मिळाले लागोपाठ 4 पेनल्टी कॉर्नर

  15 व्या मिनिटाला श्रीजेश समोर येऊन जर्मन खेळाडूला रोखण्याचा प्रयत्न करत होता पण जर्मनीला पेनल्टी कॉर्नर देण्यात आला. एक एक करून जर्मनीला पेनल्टी कॉर्नर देण्यात आले. मात्र, भारताने त्यांना 2-0 अशी आघाडी करण्याची संधी दिली नाही.

 • 05 Aug 2021 07:26 AM (IST)

  हॉकी (पुरुष) – श्रीजेशचा शानदार खेळ

  जर्मनीचा संघ सातत्याने आक्रमण करत आहे पण श्रीजेशने त्यांना आघाडी वाढवण्याची संधी दिली नाही. त्याने सलग दोन चांगले डिफेन्स केले. भारतीय संघाला आता गोलची आवश्यकता आहे.

 • 05 Aug 2021 07:20 AM (IST)

  हॉकी (पुरुष) – भारतीय संघ पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठविण्यात अपयशी

  मनदीप सिंगला भारतीय संघासाठी पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. रुपिंदर सिंगने ड्रॅग फ्लिकच्या साथीने कॉर्नरला गोलमध्ये रुपांतरित करण्याचा प्रयत्न केला पण बॉल गोलच्या वरुन निघून गेला.

 • 05 Aug 2021 07:17 AM (IST)

  जर्मनीचा दुसऱ्या मिनिटाला गोल

  भारतीय संघ दुसऱ्या मिनिटाला मागे पडला. जर्मनीच्या तैमूर ओराजने जर्मनीसाठी पहिला गोल करत संघाला सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाच्या डिफेन्समध्ये चूक झाली

 • 05 Aug 2021 07:02 AM (IST)

  हॉकी (पुरुष) -भारतीय हॉकी संघाच्या मॅचला थोड्याच वेळात सुरु होणार

  भारतीय हॉकी संघ आणि जर्मनी यांच्यादरम्यान आज ब्रॉन्ज पदकाच्या सामन्याला थोड्याच वेळात सुरु होणार आहे. हा सामना भारतीय हॉकी चाहत्यांसाठी खास आहे.

 • 05 Aug 2021 07:00 AM (IST)

  पुरुष हॉकी संघाजवळ मोठी संधी

  कांस्यपदकाच्या लढतीत आज भारतीय पुरुष हॉकी संघ जर्मनीचा सामना करणार आहे. 1980 पासून प्रत्येक ऑलिम्पिकमधून रिकाम्या हाताने परतलेल्या या संघाला पदकाची प्रतीक्षा संपवण्याची आज मोठी संधी आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI